library FILE IMAGE
पुणे

पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी साकारणार 'city library'

एका हजार जणांची क्षमता; घोले रस्त्यावर प्रकल्प

सकाळ डिजिटल टीम

पुणे: स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेची सिटी लायब्ररी उभारण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली. या प्रकल्पासाठी सहा कोटी ७१ लाख रुपयांच्या निविदेलाही मान्यता दिली आहे. घोले रस्त्यावर सुमारे २२०० चौरस मीटरची महापालिकेची महर्षी मामाराव दाते मुद्रणालयाची इमारत आहे. ही इमारत खूप जुनी झाल्याने या ठिकाणी नवीन इमारत बांधून सिटी लायब्ररी निर्माण केली जाईल.(City Library will build for competitive exams students in Pune)

पुण्यात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. त्यामध्ये केंद्रीय नागरी सेवा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन, बॅंकिंग परीक्षा यांसह इतर अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना संदर्भ साहित्याची गरज असते. हे साहित्य पारंपरिक तसेच डिजिटल ग्रंथालयाच्या स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुसज्ज वर्ग खोल्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एका वेळी एक हजार विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे या पाठपुरावा करत आहेत, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : भारतीयांनो परत जा म्हणत भारतीय महिलेवर अत्याचार; 'या' देशात घडलेल्या घटनेने जग हादरले, हल्लेखोर थेट घरात घुसले अन्…

B Pharmacy: बी फार्मसी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर; ६ हजार ९२१ विद्यार्थ्यांना जागा मिळाली

Latest Marathi News Live Update : १ नोव्हेंबरच्या मोर्चासाठी नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी

ऐकावं ते नवलंच! तब्बल १२ दिवस चाललेला कसोटी सामना, शेवटी एका संघाला परतीची बोट पकडायची होती म्हणून मॅच थांबली अन्यथा...

'ब्रेकअप के बाद' पुन्हा जवळीक, बनकरच्या आजारपणामुळे दुरावा झाला कमी; महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT