पुणे

भाजप कार्यकर्त्यांकडून शहरभर जल्लोष!

CD

पुणे, ता. ९ : नवी दिल्लीतील संसदेच्या प्रांगणात रविवारी (ता. ९) रात्री ठीक पावणेदहा वाजता खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि पुण्यात भाजपने एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, बँडचे सुमधुर संगीत आणि त्या जोडीला गरमागरम जिलेबीने तोंड गोड करून ‘अण्णां’ना नव्या राजकीय कारकिर्दीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
रविवारी सकाळी नऊ वाजता मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची वार्ता पुण्यात पसरली. त्यानंतर शहर भाजपने मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याची आणि मोहोळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची जय्यत तयारी सुरू केली. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात हा आनंदोत्सव साजरा करण्याच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार सायंकाळपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजपने कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली.
मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ रात्री पावणेदहा वाजता घेतली आणि त्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी मोहोळ व भाजपच्या नावाचा जयघोष करत एकच जल्लोष केला. या वेळी भाजपतर्फे नागरिकांना या आनंदाच्या सोहळ्यानिमित्त खास जिलेबी वाटप करण्यात आली. या वेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी नगरसेवक सम्राट थोरात, अजय खेडेकर, बापू मानकर, मनीषा घाटे, दिलीप काळोखे, धनंजय जाधव यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शपथविधी पाहण्यासाठी एलईडी स्क्रीन...
स. प. महाविद्यालय येथील चौकात भाजपतर्फे शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते. याबरोबरच बँड पथक ही ठेवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : राणे कुटुंबीयांच्या जुहूतील घरी गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT