पुणे

दीर्घकाळच्या आंदोलनासाठी सज्ज व्हावे लागेल

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.७ ः ‘‘निवडणूक प्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठीचा लढा सोपा नाही. दीर्घकाळच्या आंदोलनासाठी आम्हाला सज्ज व्हावे लागेल,’’ असे कॉक्रोच जनता पक्ष (सीजेपी) आणि विविध विद्यार्थी संघटनांकडून आज सांगण्यात आले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी येत्या शनिवारी (ता. १०) आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ‘सीजेपी’सह विद्यार्थी संघटनांच्या  नेत्यांनी ज्ञानेशकुमार यांच्यासह केंद्र सरकारला लक्ष्य केले. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काढल्या जाणाऱ्या मोर्चात देशभरातील लोकांनी सहभागी व्हावेच पण दीर्घकालीन लढ्यासाठी त्यांनी सज्ज राहावे. आंदोलनात भाग घेण्यासाठी लोकांनी बस आणि रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षित करावे,’’ असे आवाहन ‘सीजेपी’चे नेते सौरभ दास यांनी केले.
‘‘ ज्ञानेशकुमार हे गद्दार आणि देशद्रोही आहेत. ते ‘खोटारडे क्रमांक एक’ असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितले आहे. असे लोक जोपर्यंत यंत्रणेत आहेत तोपर्यंत देशाची कधीही प्रगती होणार नाही. ज्ञानेशकुमार यांना केवळ हटविले जावेच इतकीच आमची मागणी नाही तर गुन्हा दाखल करत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. एका स्वतंत्र समितीची स्थापना करत त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. 
‘‘केवळ युवावर्ग च अशा लोकांना यंत्रणेतून हटवू शकतो. हवेचा रोख बदलत असल्याची जाणीव झाल्यामुळे सरकारने २०२४ पासून युवकांची नावे मतदारयादीत नोंदविणे टाळले आहे. पोलिस दलातील पुरुष कर्मचारी महिला आंदोलनकर्त्याशी  गैरवर्तन करीत आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जेव्हा आंदोलन करण्यात आले होते, तेव्हाही पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर अत्याचार केला होता, असा आरोप दास यांनी केला.

‘आंदोलनासाठी सरकारकडून परवानगी कशाला?’

सौरभ दास म्हणाले, की जंतरमंतरवरील आंदोलनाची माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे. नंतर माहिती दिली नाही असे त्यांनी म्हणायला नको. परवानगी मिळाली नाही तर काय कराल?, असे विचारले असता आपण ‘परवानगी’ हा शब्द वापरायला नको. सरकारविरोधातील आंदोलनासाठी सरकारकडूनच परवानगी कशासाठी मागायची? असा सवाल त्यांंनी पत्रकारांशी बोलताना केला.

‘‘लोकशाही वाचविण्याच्या लढाईत ‘इंडिया’ आघाडीचे सर्व विरोधी पक्ष आणि देशाची जनता एका बाजूने आहे तर दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोग आणि भाजप आहे.’’
नेहा बोरा, ऱाष्ट्रीय अध्यक्ष, ‘एआयएसए’ विद्यार्थी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''माझ्याविरोधात 45 एफआयआर आहेत, 100 पाहिजेत...'' राहुल गांधींनी सुरु केला रस्त्यावरचा एल्गार

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतरकडे निघालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी अडवले; राहुल गांधी, प्रियंका गांधी ताब्यात

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

DCM Sunetra Pawar : दुष्काळाची जाणीव ठेवा; ऊस जगविण्याचे आव्हान मोठे

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

SCROLL FOR NEXT