Crime News esakal
पुणे

Crime : पुण्यातील वर्दळीच्या एफसी रोडवर तुंबळ हाणामारी; दुकानातील कर्मचारी आपआपसात भिडले

सकाळ डिजिटल टीम

पुणे - एकमेकांच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांवरुन सुरू झालेला वाद थेट मारामारीपर्यंत पोहचला आहे. ही सगळी घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तुषार अल्हाट यांनी या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या प्रकरणी महेश नायक (२४), सूरज कालगुडे (२१), अमित देशपांडे (२६), विशाल उकिर्डे (२१) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना दुकानात येऊन खरेदी करावी यासाठी एफसी रोड वरील अनेक दुकानातील कर्मचारी मोठं मोठ्याने ओरडून आकर्षित करत असतात. दरम्यान, घडलेला प्रकार देखील अशाच प्रकारचा आहे.

अटकेतील आरोपी यांच्यासह इतर ४ ते ५ जण हे एफसी रोडवरील वेगवेगळ्या दुकानात कामाला आहेत. आपल्या दुकानात येऊन ग्राहकांनी खरेदी करावी यासाठी या सर्वांमध्ये चढाओढ सुरू असते. मंगळवारी दुपारी या आरोपींनी एकमेकांच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांवरुन वाद घातला. हा वाद विकोपाला गेला आणि त्यांच्यात शिवीगाळ होऊन मारामारी पर्यंत पोहोचला. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला होता.

या प्रकरणी आरोपींवर भारतीय दंडात्मक कलम १४३, १४५ ,१४६, १६०, ५०४, ५०६, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून डेक्कन पोलिस पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT