पुणे, ता. ५ : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन’ (एसएचवीआर) २०२६-२७ अंतर्गत जिल्हास्तरावरील शाळा निवड प्रक्रियेला केंद्र सरकारने १९ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, नव्या आदेशानुसार शाळा निवडीसाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले.
शाळांमध्ये स्वच्छता, हरितपणा सर्वसमावेशक वातावरण आणि पर्यावरण संरक्षणाच्या सवयी विकसित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यु-डायस कोड असलेल्या राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित, खासगी, निवासी, आदिवासी आणि अल्पसंख्याक शाळांना हे मूल्यांकन असणार आहे. स्वच्छ आणि हरित विद्यालय २०२५-२६ च्या यशाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत २०२६-२७ ची अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. शाळांमधील पाणी, शौचालये, साबणाने हात धुणे, संचालन व देखभाल, वर्तन परिवर्तन आणि क्षमता विकास आणि मिशन उपक्रम या सहा विषयांवर आधारित शाळांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.
शाळांची नोंदणी आणि स्वमूल्यांकन सुलभ करण्यासाठी एसएचव्हीआर पोर्टल आणि मोबाईल ॲप देखील कार्यन्वित करण्यात आले आहे. राज्यातील शाळांमधील ‘स्वच्छ आणि हरित विद्यालय २०२६-२७’च्या अंमलबजावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी : https://shvr.education.gov.in संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.