Chandrakant Patil Sakal
पुणे

स्वच्छ नदी हि प्रदूषण विरहित शहराची निदर्शक - आमदार चंद्रकांत पाटील

'नदी ही जीवनवाहिनी असते, ती प्रवाही असणे हे जीवंतपणाचे लक्षण असून आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांव्दारे नदीचे शुद्धीकरण व्हावे.

सकाळ वृत्तसेवा

'नदी ही जीवनवाहिनी असते, ती प्रवाही असणे हे जीवंतपणाचे लक्षण असून आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांव्दारे नदीचे शुद्धीकरण व्हावे.

औंध - 'नदी (River) ही जीवनवाहिनी असते, ती प्रवाही असणे हे जीवंतपणाचे लक्षण असून आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांव्दारे नदीचे शुद्धीकरण (River Purification) व्हावे. स्वच्छ नदी प्रदूषण विरहित (Pollution Free) शहराचे निदर्शक असल्याचे" मत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी व्यक्त केले. किर्लोस्कर वसुंधरा राम नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या पुढाकारातून आणि पाषाण येथील सोमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि मॉडर्न कॉलेज गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने किर्लोस्कर वसुंधरा राम नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या तृतीय वर्षपूर्ती निमित्त पाषाण येथील ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या आणि सुमारे 900 वर्षे जुन्या सोमेश्वर मंदिर परिसरातील जलकुंडाच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार विनायक निम्हण, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे तसेच नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, ज्योत्स्ना एकबोटे, सनी निम्हण, पोपटराव जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर अनिल गायकवाड, शैलजा देशपांडे, सुवर्णा भांबूरकर आणि वैशाली पाटकर, शैलेंद्र पटेल आदी मान्यवरांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'आधुनिक उपक्रम रामनदी पुनरूज्जीवन प्रकल्पात देखील राबविता येणे शक्य असून मुख्यतः नदीत प्रदुषित पाणी सोडलेच जाणार नाही इथपासूनच नदी शुद्धीकरणाच्या प्रकल्पाचा प्रारंभ होतो.

रामनदी पुनरूज्जीवन प्रकल्पात मी माझ्या परीने टप्प्या टप्प्याने सहभागी झालो आहे. स्वच्छता उपक्रम राबविण्यापासून पुस्तक प्रकाशनापर्यंत नानाविविध प्रकल्पांच्या माध्यमातून नदी शुद्धीकरणाच्या दिशेने लोकमानस तयार करणे, लोक चळवळ उभी करणे यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत'. यावेळी सोमेश्वरवाडी परिसर आणि या जलकुंडाच्या शुद्धीकरणासाठी चंद्रकांत पाटील यांनी दोन कोटी रूपयांच्या निधीची घोषणा देखील केली. यावेळी बोलताना आमदार विनायक निम्हण म्हणाले की, ज्या नदीच्या काठावर जलकुंड असते त्याला श्रीक्षेत्राचा दर्जा मिळालेला असतो. सोमेश्वरवाडीतल हे शिव मंदिर देखील सुमारे बाराशे-तेराशे वर्षे पुरातन असून मंदिराला माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या पदस्पर्शाने हे पावन झालेले आहे. या जलकुंडाची झालेली दुर्दशा लवकरात लवकर सुधारावी, यासाठी लोकचळवळ उभी करू.

यावेळी बोलताना वीरेंद्र चित्राव म्हणाले की, या जलकुंडाचे पाणी भाविक तीर्थ म्हणून प्राशन करायचे ती स्थिती पुर्ववत होईल, असे आदर्श काम या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाईल. हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श प्रारूप ठरावा' यावेळी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे यांनीही मनोगत व्यक्त करून प्रकल्पास शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT