abc.jpg 
पुणे

भाजपा चिंचवड विधानसभा यांच्या वतीने सांगवीत स्वच्छता मोहीम

रमेश मोरे

जुनी सांगवी : भाजपा चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा भारतीय जनता पार्टी, वुई लव्ह फाऊंडेशन व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सांगवी येथील पीडब्ल्युडी मैदान व परिसरात 'जागतिक स्वच्छता मोहीम-२०१८' अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

जुनी सांगवी येथील पिडब्ल्यूडी वसाहतीच्या मैदानात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात चिंचवड विधानसभेचे सर्व नगरसेवक, एक हजार स्वयंसेवक, आरोग्य विभागाचे सव्वाशे कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्या (ह) प्रभाग प्रशासन अधिकारी आशा राऊत, आरोग्य अधिकारी व चिंचवड विधानसभा प्रभागातील सर्व नगरसेवक उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर, चिंचवड विधानसभा स्वच्छता अभियानासाठी प्रत्येकाने किमान १० कार्यकर्ते सोबत आणावेत , असे आवाहन श्री लक्ष्मण जगताप शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आले होते. स्थानिक प्रभाग क्रं. ३२ मधील नगरसेवक हर्षल ढोरे, माई ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण राणे आदींनी या स्वच्छता मोहिमेचे संचलन केले. यावेळी स्वयंसेवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! 'या' लाडक्या बहिणींवर होणार कारवाई, मंत्री आदिती तटकरेंचा थेट इशारा..

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात जसा तपास पुढे जाईल तसे धक्कादायक पुरावे समोर; विद्यार्थ्यांच्या वहीत सापडले हाताने लिहिलेले प्रश्न

IND VS AFG 2026 Squad: रिषभ पंतचा करेक्ट कार्यक्रम! उप कर्णधारपदावरून उचलबांगडी; ३ वर्षानंतर 'या' खेळाडूकडे पुन्हा जबाबदारी

'MS Dhoni खेळतोय की नाही, मला फरक पडत नाही, त्याच्या नादात CSK ने...', संजय मांजरेकरांचं रोखठोक मत

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT