पुणे

इंदापूरच्या शिवभक्त परिवारच्या माध्यमातून कुरुंदवाडमध्ये स्वच्छता मोहिम...

राजकुमार थोरात

वालचंदनगर : जिकडे बघावे तिकडे कचऱ्याचे ढीग.... रस्त्यावर साचलेला गाळ....प्लाॅस्टिकचा कचरा....घरामध्ये पुराच्या पाण्याने झालेली घाण...हे चित्र आहे कोल्हापूर जिल्हातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिकेच्या हद्दीतील.

कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमाजवळची कुरुंदवाड नगरपालिका... दोन्ही नद्यांच्या फुगवट्याचे पाणी गावामध्ये घुसल्याने आठ ते दहा फुट गाव पाण्याखाली होते. एका रात्री होत्याचे नव्हते झाले. गावातील नागरिकांना घरे,दुकाने सोडून निघून जावे लागले होते. सध्या गावातील पूर ओसरला आहे.मात्र जिकडे बघावे तिकडे प्लॉस्टिक कचरा व कचऱ्याचे ढीग दिसत आहे. इंदापूर तालुक्यातील शिवभक्त परिवारातील युवकांनी कुरुंदवाडमध्ये स्वच्छता मोहिम राबवून गावाला मदतीचा हात दिला.

इंदापूर तालुक्यातील शिवभक्त परिवार माध्यमातून प्रत्येक महिन्यामध्ये राज्यातील वेगवेगळ्या गडावर स्वच्छता मोहिम राबविण्यात येते. मात्र यावेळी शिवभक्त परिवारातील युवकांनी गडावरच्या स्वच्छता मोहिमेला फाटा देवून कोल्हापूर जिल्हातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये स्वच्छता माेहिम राबविण्याचा निर्धार केला. या मोहिमेमध्ये  इंदापूर तालुक्यातून सुमारे तीस युवक सहभागी झाले होते.तसेच या युवकांना  पुण्यातील सेवापर्व युवकांचीही साथ मिळाली.यामध्ये भोर,वेल्हा,हवेली जिल्हातील ही युवक सहभागी झाले होते. युवकांना नगरपालिकेने टॅक्ट्रर व ट्रॉली उपलब्ध करुन दिल्यानंतर युवकांनी पुरामध्ये वाहून आलेल्या रस्त्यावरील घाण ट्रॉलीमध्ये भरुन दिली. गल्लीतील कचराच्या विल्हेवाट लावली.  शिवभक्त परिवारचे अनिल गुळुमकर, मनोज मोरे,  बाबासाहेब राखुंडे,  राहुल धुमाळ,  रोनक बागीरिचा, विकास भोसले, आश्रम फडतरे, अमित शिंगटे, धीरज गाढवे, मोहम्मद मुलानी ,आबासाहेब राखुंडे यांनी सहभाग घेतला.

खराटे,खोरी घेवून जाण्याची गरज...
सध्या पुणे जिल्हातील अनेक युवक स्वच्छता मोहिमेसाठी कोल्हापूर व सांगली जिल्हात जात आहेत.स्वच्छा करण्यासाठी युवकांना जाताना खराटे,खोरी शक्य असल्यास पाट्या घेवून जाण्याची गरज असल्याचे शिवभक्त परिवाराचे सदस्य अनिल गुळूमकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT