पुणे

डेहणे परिसरात ६.५ टन कचऱ्याची विल्हेवाट

CD

चास, ता. ४ ः डेहणे (ता. खेड) व परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य देत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवत सुमारे ६. ५ टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. या मोहिमेत प्रतिष्ठानच्या 97 सदस्यांनी सहभाग घेतला होता.
सोमवारी (ता. १) डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने डेहणे ग्रामपंचायत परिसरामध्ये स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. आपला परिसर स्वच्छ रहावा तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता यावी या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी आठपासून प्रतिष्ठानच्या ९७ सदस्यांकडून डेहणे परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, जानोबा मंदिर, पशुवैद्यकीय दवाखाना परिसरातून १.५ टन ओला कचरा व ५ टन सुका कचरा गोळा करण्यात आला. ग्रामपंचायती मार्फत पुरविण्यात आलेल्या व प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आणलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून हा कचरा डेपोपर्यंत नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता हे समाज विकासाचे प्रमुख अंग असून संत गाडगे महाराजांच्या कार्याचा परिचय व ग्राम स्वच्छता अभियानाचे महत्त्व समजून सांगण्यात आले. अभियानाप्रसंगी डेहणे गावच्या सरपंच मिना लांघी, सुपे मेमोरियल फाउंडेशनचे डॉ. संतोष सुपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनघरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य याशिवाय माजी सरपंच दत्तात्रेय खाडे, हरिश्चंद्र कोरडे, निवृत्त केंद्रप्रमुख एकनाथ लांघी, गणेश कोरडे, चिंधुबुवा कशाळे, मारुती कशाळे, चंद्रकांत कशाळे, वाजे गुरूजी, तुकाराम कशाळे, जगदीश कशाळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ४१ वर्षांनंतर निकाल... सर्वोच्च न्यायालयाने ठरवले दोषी पण तुरुंगवासाची शिक्षा माफ, काय होता १९८५ मधील खटला?

लोकांच्या घरात आश्रय ते गळक्या घरात संसाराची सुरुवात; शेर शिवराज फेम अभिनेत्याने उलगडला स्ट्रगलचा काळ

Latest Marathi News Live Update : मुंबईत प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

War Impact on Grape : युद्धाचा द्राक्ष दरावर परिणाम नाही; जिल्ह्यात ३० टक्के शिल्लक, उन्हाळ्यामुळे मागणीत वाढ, रमजानचाही परिणाम

धाडस केलं आणि टोकं अमाऊंट भरूनच टाकली... मराठमोळ्या इन्फ्ल्युएन्सरने मुंबईत घेतलं स्वतःचं घर; शेअर केले फोटो

SCROLL FOR NEXT