पुणे

देशात उद्या बंद; पण 'या' संघटनेचा नसेल सहभाग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशातील विविध कामगार संघटनांनी येत्या बुधवारी (ता.8) पुकारलेल्या देशव्यापी संपापासून दूर राहण्याचा निर्णय राज्यातील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या लिपिकांचा संपाला नैतिक पाठिंबा असेल मात्र प्रत्यक्षात ते संपात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे सर्व लिपिकवर्गीय कर्मचारी संपाच्या दिवशीही आपापल्या कार्यालयात हजर राहून नियमित काम करणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सर्व लिपिक कामावर येणार असल्याचे या संघटनेचे राज्य अध्यक्ष गिरीश दाभाडकर आणि कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी मंगळवारी (ता.7) दिली.

संघटनेच्यावतीने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, पुणे जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेनेही या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांना लेखी पत्र दिले असल्याचे या संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष शेखर
गायकवाड आणि सचिव किशोर कुलकर्णी यांनी मंगळवारी (ता.7) सांगितले.

सूर्यवंशी म्हणाले, "राज्यात नुकतेच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. लिपिकांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी नवीन सरकारला वेळ देण्याची गरज आहे. त्यामुळे या संपात सहभागी न होता, कार्यालयांतील दैनंदिन कामे करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT