Clickotsav 
पुणे

गणरायाबाबतच्या छायाचित्रांचे ‘क्‍लिकोत्सव’

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘सकाळ’ माध्यम समूह व पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध एपीजी लर्निंग संस्थेतर्फे यंदा गणेशोत्सवाचे औचित्य साधून  ‘क्‍लिकोत्सव’ या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी गणेशोत्सवादरम्यान काढलेले कोणतेही छायाचित्र स्पर्धक देऊ शकतात. 

या स्पर्धेत कोणीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. स्पर्धेसाठी कोणतीही वयोमर्यादा नसून, स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी एकूण एक लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे आहेत. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये किमतीचे गिफ्ट व्हाउचर देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २५ सप्टेंबर ही अंतिम मुदत असून, ३० सप्टेंबरला सर्व छायाचित्रांचे प्रदर्शन व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. 

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.apglearning.in या संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करता येऊ शकते. तसेच एपीजी लर्निंग, सकाळनगर, औंध-बाणेर रस्ता येथे जाऊनसुद्धा नावनोंदणी करता येऊ शकते.

स्पर्धेसाठीचे छायाचित्र हे गणेशोत्सवासंदर्भातील असणे आवश्‍यक असून, ते ८ बाय १० साइजचे असावे. स्पर्धकाने ऑनलाइन सहभाग नोंदवला असेल तर छायाचित्र हे JPEG मध्ये १० एमबीपर्यंतच्या साइजचे असणे आवश्‍यक आहे. ऑनलाइन सहभागासाठी वेबसाइटवर जाऊन नावनोंदणी केल्यानंतर स्पर्धकाला ‘क्‍लिकोत्सव टीम’कडून पुढील माहिती पाठवण्यात येईल. ऑनलाइन सहभागासाठी प्रतिनोंदणी ५५० रुपये शुल्क आहे; तसेच एपीजी लर्निंगच्या केंद्रावर येऊन नावनोंदणी केल्यास स्पर्धकाला त्यांचे छायाचित्र हे छापील स्वरूपात जमा करणे बंधनकारक असून, त्यासाठी प्रतिनोंदणी पाचशे रुपये शुल्क आहे.

‘क्‍लिकोत्सव’संदर्भातील अधिक माहिती 
www.apglearning.in या संकेतस्थळावर मिळेल किंवा ७३५०००१६०१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT