पुणे

हेड झोपेवर हवामान बदलाचा घाला

CD

नवी दिल्ली, ता.१५ (वृत्तसंस्था) ः हवामान बदलाचा विपरीत परिणाम हा भारतीयांच्या झोपेवर देखील होऊ लागला असून याबाबत भारत एक जागतिक हॉटस्पॉट बनल्याचे ‘क्लायमेंट सेंट्रल’च्या अहवालातून उघड झाले आहे. झोप कमी झाल्यामुळे त्याचा व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे हा अहवाल सांगतो. दक्षिणेकडील राज्यांतील लोक हे दरवर्षी ७८ ते ९१ तास झोप गमावत आहेत. केवळ हवामान बदलामुळे गमावलेल्या आठ ते नऊ तासांच्या झोपेचा यात समावेश आहे. जागतिक पातळीवर (२०२०-२०२५) रात्रीच्या उष्णतेमुळे व्यक्तीने दरवर्षी सरासरी सुमारे ५६ तासांची झोप गमावली आहे.

निवडक प्रदेशांवर प्रभाव अधिक
झोपेच्या वार्षिक नुकसानीपैकी अंदाजे सहा तास किंवा दहा टक्क्यांहून अधिक नुकसान हे हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे होत असल्याचे दिसून येते. जागतिकस्तरावर उष्णतेशी संबंधित झोपेच्या एकूण नुकसानीमध्ये हवामान बदलाचा वाटा तुलनेने कमी असला तरी, काही प्रदेश आणि शहरांमध्ये त्याचा प्रभाव लक्षणीयरीत्या अधिक असल्याचे दिसून येते. ज्या ठिकाणी आधीच रात्रीचे तापमान अत्यंत उष्ण असते, अशा ठिकाणी याचा मोठा परिणाम दिसून आला.

.........
- जगातील १ हजार ३३८ प्रमुख शहरांमध्ये सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीपासून हवामान बदलाशी संबंधित तापमानवाढीमुळे होणाऱ्या झोपेच्या नुकसानीचे प्रमाण किमान दुप्पट झाले आहे.
......
भारताची स्थिती (१०७ शहरांचे विश्लेषण)
.....
हवामान बदलामुळे घटलेली झोप (वार्षिक प्रतिव्यक्ती)
.....
७.९ अतिरिक्त तास
तमिळनाडू
.......
महत्त्वाच्या शहरांत
झोपेचे नुकसान
(मेट्रो शहरांचा समावेश अधिक)
- चेन्नई ः ९३ तास
- मुंबई ः ८४ तास
- कोलकता ः ८० तास
.......
मोठा इशारा
८ तास
बंगळूर
.......
महाराष्ट्र
- वार्षिक सरासरी झोपेचे नुकसान ः ७६.३ तास
- हवामान बदलाशी संबंधित ः ५.८ तास
.......
उत्तरप्रदेश
- स्थानिकांची झोप वार्षिक ६९ तासांनी घटते
- ४.९ तास हा वेळ हवामान बदलामुळे
........
कमी झोपेचे दुष्परिणाम
- ह्रदयविकार
- ढासळलेले मानसिक आरोग्य
- रोगप्रतिकार शक्तीत कमतरता
- उत्पादकतेमध्येही घट
......
सात तासांपेक्षाही कमी झोप घेण्याचे दुष्परिणाम
- रोगप्रतिकार क्षमता, कामगिरीवर परिणाम
- चुका वाढतात, दुर्घटना, वेदनांचा धोका
......
कमी झोपेमुळे
- वजन वाढते
- मधुमेह
- अतिताण
- ह्रदयविकार
- अकाली मृत्यू
...........

अभ्यासक म्हणतात
रात्रीच्या उष्णतेमध्ये तीव्र चढउतार पाहायला मिळत असल्याने त्याचा झोपेवर परिणाम होतो. झोपेतील व्यत्यय ही सार्वजनिक आरोग्य आणि मानवी उत्पादकता या दोन्हींसाठी धोकादायक बाब मानली जावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kudankulam Data Leak: देशाच्या अणुसुरक्षेला मोठा धोका? भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; कुडनकुलम प्रकरण नेमकं काय आहे?

IPL 2027: नवा कॅप्टन ते हार्दिक पांड्याचे ट्रेड... Mumbai Indians ची मोठे निर्णय घेण्यासाठी इंग्लंडमध्ये मिटिंग

'पापा' किंवा 'डॅडी' नाही तर आमिर खानला 'या' नावाने हाक मारतो सावत्र मुलगा क्वीन; आमिरची मुलं सावत्र आईला काय म्हणतात?

Latest Marathi News Update : उरुळी कांचन येथे २३० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

Ladki Bahin Yojana: 'भीक मागायची वेळ आली'? लाडक्या बहिणी संतापल्या..

SCROLL FOR NEXT