Pune Rain sakal
पुणे

Pune Rain : पुण्यात दहा वर्षांतील सर्वाधिक वळीव

शहरात सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता. ११) वळिवाच्या पावसाच्या दमदार सरी बरसल्या. त्यामुळे गेल्या दशकात मेमध्ये पडलेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता. ११) वळिवाच्या पावसाच्या दमदार सरी बरसल्या. त्यामुळे गेल्या दशकात मेमध्ये पडलेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. यापूर्वी २०१५ मध्ये (१४ मे) एका दिवसात १०२ मिलिमीटर पाऊस कोसळला होता. त्यानंतर आता शनिवारी सायंकाळी साडेआठपर्यंत शहरात ४०.४ मिलिमीटर पाऊस पडला.

शहरात यंदा एप्रिलमध्ये गेल्या २४ वर्षांमधील सर्वाधिक कडक उन्हाळा ठरला. त्यानंतर मेमध्ये सुरुवातीचे नऊ दिवस उन्हाचा चटका कायम होता. कमाल तापमानाचा पारा सातत्याने सरासरीपेक्षा जास्त नोंदला जात होता.

शुक्रवारी सकाळी साडेआठ ते शनिवारी सकाळी साडेआठ या २४ तासांमध्ये शिवाजीनगर येथे २८.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी सायंकाळी ४०.४ मिलिमीटर पावसाची नोंद शिवाजीनगर येथील वेधशाळेत झाली. हा गेल्या दशकातील सर्वाधिक पाऊस ठरला.

शनिवारी शिवाजीनगर येथील वेधशाळेत कमाल तापमानाचा पारा ३७.८ अंश सेल्सिअस नोंदला गेला. लोहगाव येथे ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT