Cloudburst in eastern part of Ambegaon taluka Massive damage of agriculture 
पुणे

आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात ढगफुटी

शेतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सुदाम बिडकर

पारगाव - आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील धामणी, खडकवाडी, पोंदेवाडी, देवगाव, लोणी, पहाडदरा, काठापूर बुद्रुक व लाखणगाव परिसरात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने ओढ्यानाल्याना पूर आला होता. सुमारे एक ते दीड तास पाऊस पडत होता काही गावात मंदिर व घरांच्या भिंती कोसळल्या आहेत तर अनेक ठिकाणी मातीनालाबांध फुटल्याने नुकसान झाले. शेतात पाणी साचून पिकांचे तसेच शेताचे बांध फुटल्याने शेतांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धामणी येथे आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस झाला व ओढयानाल्यांना पुर आले. मंदीरांच्या संरक्षण भिंती, घरांच्या भिंती पडल्या, शेताचे बांध वाहुन गेले, शेतीमध्ये पाणी साचुन शेतपिकांचे नुकसान होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी प्रशासनाने त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले व सरपंच सागर जाधव यांनी केली आहे.

लोणी व शिरदाळे परिसरात आज शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आले आहेत.तब्बल पाच वर्षांच्या कालावधीनंतर या परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे . या पावसाचा फटका शेती पिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. लोणी परिसरात देखील उच्चांकी पाऊस झाला असून पाण्याचा प्रश्न जरी मिटला असला तरी शेती पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.दर वर्षीच्या तुलनेत यावर्षी शिरदाळे येथे पावसाळी बटाटा लागवडीचे प्रमाण जरी घटले असून बटाट्याच्या तुलनेत सोयाबीन, वाटाणा, गवार तसेच कडधान्य आदी पिके शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात घेतली आहे.

आजच्या या पावसाने हि पिके जाण्याचा धोका निर्माण झाला आहे त्याचप्रमाणे बटाटा लावलेल्या शेतांच्या सरीत तसेच वावरात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे सध्या वावरांना शेततळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून त्यामुळे बटाटा शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून कृषी विभागाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शरद बँक संचालक अशोक आदक पाटील, शिरदाळेचे उपसरपंच मयुर सरडे, गणेश तांबे यांनी केली आहे. पहाडदरा परिसरात बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती संतोष कुरकुटे व गुलाब वाघ यांनी केली. पोंदेवाडी येथे आजच्या पहाटेच्या पावसामुळे तरकारी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून संबधितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT