शिवाजीनगर - विविध यंत्रांच्या मदतीने तापमान, पाऊस, वाऱ्याची दिशा व वेग कसा मोजतात, हे दाखविताना उमेश कुलकर्णी.
शिवाजीनगर - विविध यंत्रांच्या मदतीने तापमान, पाऊस, वाऱ्याची दिशा व वेग कसा मोजतात, हे दाखविताना उमेश कुलकर्णी. 
पुणे

ढग, वारा, पावसाचा असा घेतात वेध! (व्हिडिओ)

नीला शर्मा

पुणे - वाऱ्याची दिशा व वेग, तापमान, आर्द्रता, ढग यांचा अभ्यास वेधशाळेतले शास्त्रज्ञ, तज्ज्ञ वेगवेगळ्या यंत्रांच्या साह्यानं घेतात.

पर्जन्यमापक वापरून पावसाचं प्रमाण व वातकुक्कुट यंत्राच्या माध्यमातून वारा कोणत्या दिशेनं येऊन कोणत्या दिशेला जातो आहे, हे पाहणं आपल्याला मजेदार वाटू शकतं. पण, शास्त्रज्ञांचा मात्र त्याआधारे मोठा अभ्यास सुरू होतो, बरं का..!

शिवाजीनगर परिसरातील भारतीय हवामान खात्यातील शास्त्रज्ञ उमेश कुलकर्णी पर्जन्यमापक उपकरण उघडून आतील एकेका घटकाची माहिती देत होते. हे उपकरण जमिनीच्या किती वर असलं पाहिजे, ते सांगत होते. यात जमणारं पावसाचं पाणी काचेच्या एका नळीत कसं मोजलं जातं, तेही त्यांनी सांगितलं. वातकुक्कुट यंत्राआधारे वारा कुठून कुठं चालला आहे, याची दिशा कशी जाणून घेतात, हेही त्यांनी सांगितलं. याचबरोबर तापमान व आर्द्रता कशी मोजतात, याची माहिती दिली.

विद्यार्थ्यांना या कार्यालयात ही सर्व माहिती मिळू शकते. त्यासाठी भारतीय हवामान खात्याच्या संबंधित कार्यालयाला शाळा किंवा मुलं व पालकांच्या गटानं अर्ज करून परवानगी घ्यावी लागते. यंत्रसामग्री, ती कशी वापरतात वगैरे तपशील येथील शास्त्रज्ञ सांगतात. मुलांच्या प्रश्नांना शास्त्रीय माहितीच्या आधारे उत्तरं देतात.

कुलकर्णी यांनी ढगांच्या नकाशाचं संकलित पुस्तक दाखवलं. त्यात असलेली ढगांची छायाचित्रं दाखवीत ते म्हणाले, ‘ढगांची तीन पाळ्यांमध्ये वर्गवारी केली जाते. अगदी खालच्या, मधल्या आणि वरच्या पातळीवरील ढग लक्षात घेतले जातात. याशिवाय, ढग भरीव आहेत की विरळ, तेही पाहिलं जातं.’’ 

ढग, पाऊस, वाऱ्याची दिशा व वेग, तापमान, आर्द्रता अशा निसर्गघटकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास हा शेती, विमानप्रवास, सागरप्रवास वगैरे विविध कामांसाठी उपयोगी ठरतो. मुलांनी याची माहिती करून घेतली आणि त्यामुळे जर या विषयाची गोडी लागली, तर भविष्यात काही उत्तम हवामान शास्त्रज्ञ नक्की घडू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT