Environment 
पुणे

पुढील काही दिवस पुण्यात ढगाळ वातावरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात येत्या तीन दिवसांमध्ये किमान तापमानात वाढ आणि वातावरण ढगाळ राहणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. गेल्या आठवडाभरात शहरात आणि परिसरात गारवा होता. किमान तापमानातदेखील घट झाली होती. तसेच रविवारी (ता. ५) सकाळी दहा वाजेपर्यंत शहरातील विविध भागांमध्ये धुक्‍याची दुलई पसरली होती.

नागरिक कानटोपी, स्वेटर आणि जॅकेटचा आधार घेत कामासाठी घराबाहेर पडत होते. परंतु मंगळवार (ता. ७) ते गुरुवारी (ता. ९) शहर आणि परिसरातील किमान तापमानात १६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्‍यता. तर शुक्रवारपासून पुन्हा तापमानात घट होणार असल्याची शक्‍यता हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आली आहे. तसेच गोव्यासह संपूर्ण राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. रविवारी शहरातील किमान तापमान ११.७ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT