पुणे

ढगाळ वातावरणाने उडविली आंबा उत्पादकांची झोप

CD

ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक चिंतेत

ढेबेवाडी- काळगाव विभागातील स्थिती; भुरीसह तुडतुड्यांचाही प्रादुर्भाव

ढेबेवाडी, ता. १० : भरपूर मोहर आणि त्यातून डोकावणाऱ्या छोट्या छोट्या कैऱ्या यामुळे यंदा आंब्याचे चांगले उत्पन्न मिळेल, या आशेवर असलेल्या विभागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांची काळजी आता ढगाळ वातावरण आणि किडींच्या प्रादुर्भावाने वाढवली आहे.
विभागात अनेक शेतकऱ्यांच्या मालकीच्या आंब्याच्या बागा आहेत. त्याशिवाय शेताच्या बांधावर आणि घराच्या परिसरातही अनेकांनी आंब्याची लागवड करून त्याची जोपासनाही चांगल्या पद्धतीने केल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी आंबा लागवडीखालील क्षेत्रामध्ये परिसरात वाढच होत आहे. डोंगरपट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मालकीच्या आंब्याच्या बागा असून, सपाटीच्या गावांमध्येही फळबागा बहरल्या आहेत. पूर्वी डोंगर भागात रस्ते व पाण्याची व्यवस्था नसतानासुद्धा शेतकऱ्यांनी डोक्यावरून घागरीने पाणी आणून बागा जगविल्या आहेत. बागेतील खत व पाणी व्यवस्थापनासह वनव्यांपासून झाडांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करतात.
हापूस, केशर, रत्ना यासह रायवळ आंब्याने परिसरातील अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक हातभार दिला असून, त्यांचे वार्षिक आर्थिक गणित याच हंगामावर अवलंबून असते. यंदाच्या हंगामात चांगल्या पद्धतीने आलेला मोहर आणि त्यानंतर छोट्या-छोट्या कैऱ्यांनी लगडलेली झाडे यामुळे यंदा आंब्यातून चांगले. उत्पन्न मिळेल या आनंदात असलेले विभागातील आंबा उत्पादक शेतकरी आता सततचे ढगाळ वातावरण आणि किडींच्या प्रादुर्भावाने काळजीत पडले आहेत. सध्या झाडे मोहराने फुलली असली तरी वांझ मोहराचे प्रमाण जास्त आहे. उत्पादनात त्यामुळे मोठी घट होण्याची भीती आहे.
--------------
कोट

आंब्यावर रासायनिक कीटकनाशकांचा अतिप्रमाणात वापर केल्याने मित्रकिडींचा अभाव जाणवत आहे. परिणामी, परागीभवनात अडथळा येऊन वांझ मोहराचे प्रमाण वाढले आहे. तुडतुडे व भुरीचाही प्रादुर्भाव असल्याने उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची भीती आहे.

- राजू ऊर्फ सूर्यकांत काळे, काळगाव
------------------------------------
08107, 08108
साबळेवाडी : मोठ्या प्रमाणात आलेल्या मोहराने झाकून गेलेले आंब्याचे झाड.
--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इरतांना धडकी भरवणारी बातमी

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Malshiras Well Accident : हायवे पूर्ण झाल्याचा खोटा दाखला अन् 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू! तांदुळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, कंत्राटदार अजूनही मोकाट

FIH Hockey Nations Cup: भारतीय महिला ठरल्या चॅम्पियन! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT