पुणे

बारामतीत कमळ फुलवू, आता जिंकणारच; मुख्यमंत्र्यांचा विश्वास

सकाळवृत्तसेवा

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार जिंकणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

शक्ती केंद्र संमेलन आणि पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आज (शनिवार) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत आणि पुणे, बारामती आणि शिरूर या मतदारसंघांबाबत व्यक्तव्ये केली. 

मुख्यमंत्री म्हणाले, की आगामी निवडणुकीत ४८ जागा लढवण्याची आमची तयारी आहे. बारामती लोकसभा आता जिंकणारच आहोत. या निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर लढणार आहोत. मागील निवडणुकीत चूक झाली त्यामुळे हरलो, पण आता तसे होणार नाही. महाराष्ट्रात आम्ही जिंकलेल्या 42 जागांच्या आता 43 जागा होतील आणि ती 43 वी जागा बारामतीची असेल. बारामतीत भाजपचे कमल फुलवू. पुढील निवडणूक सत्तेसाठी नव्हे तर भारताच्या आयुष्य आणि भविष्यासाठी महत्त्वाची असेल. त्यामुळे ती पुन्हा जिंकायची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT