cm eknath shinde at bhimashankar temple last shravan somvar 2023 politics pune sakal
पुणे

Bhimashankar : मुख्यमंञी एकनाथ शिंदेंनी घेतले श्री क्षेत्र 'भीमाशंकर'चे दर्शन; राज्यावरचे संकट दूर कर, अशी केली प्रार्थना

राज्याचे मुख्यमंञी झाल्यानंतर भीमाशंकराच्या भेटीसाठी येण्याची ही दुसरी वेळ आहे. भगवान शंकराच्या दर्शनानंतर कळमजाई मातेचे दर्शन त्यांनी घेतले

सकाळ वृत्तसेवा

भीमाशंकर : राज्याचे मुख्यमंञी यांनी चौथ्या श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर चे दर्शन घेतले.राज्यातील बळी राज्यावरचे संकट दूर कर, पाऊस पडू दे. दुष्काळाचे आलेलं संकट दूर होऊ दे, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे. राज्यातील जनता सुखी होवु दे अशी प्रार्थना भगवान शंकराला केल्याचे त्यांनी सांगितले.

सालाबाद प्रमाणे याही वर्षी मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी श्रावण महिण्यातील चौथ्या सोमवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येऊन जलभिषेक करत दर्शन घेतले. त्यांच्या समवेत मुलगा खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील होते. यावेळी वेदमुर्ती मधुकर शास्ञी गवांदे यांनी पौराहित्य केले.

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी श्रावण महिन्यात भीमाशंक चरणी माथा टेकायला यायचे. एकनाथ शिंदेंनी ती परंपरा आजही ही कायम ठेवली आहे शिंदे हे गेले कित्येक वर्षांपासुन न चुकविता श्रावण महिन्यामध्ये श्री क्षेञ भीमाशंकराच्या दर्शनासाठी येत आहेत.

राज्याचे मुख्यमंञी झाल्यानंतर भीमाशंकराच्या भेटीसाठी येण्याची ही दुसरी वेळ आहे. भगवान शंकराच्या दर्शनानंतर कळमजाई मातेचे दर्शन त्यांनी घेतले. शिंदे पुढे म्हणाले,परंपरेप्रमाणे भीमाशंकर चरणी मनोभावे पूजा झाली. लाखो भाविकांनी श्रावण महिन्यात मोठ्या श्रद्धेने दर्शनाला येतात. मी सुद्धा आनंद दिघे पासून येतोय.

आजची सर्व पक्षीय बैठक आहे, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलावलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटायला हवा, त्या अनुषंगाने सरकार योग्य रित्या काम करतंय. कोणावर ही अन्याय न करता, मराठा समाजाला आरक्षण देऊ.

या साठी सर्व घटकांना आणि विरोधी पक्षांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो.भीमाशंकर मंदिर परिसरातील विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत असे त्यांनी सांगितले. श्री क्षेञ भीमाशंकर हे बाराज्योर्तीर्लिंगापैकी सहावे ज्योर्तिर्लिंग आहे दरवर्षी श्रावणी महिन्यामध्ये विशेषत: दर सोमवारी देशाच्या कानाकोप-यातुन लाखो भाविक व पर्यटक येत असतात.

परंतु श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी तिसर्‍या व चौथ्या श्रावणी सोमवारी काही प्रमाणात कमी गर्दी पहावयास मिळते. परंतु चालु वर्षी ह्या दोन्ही सोमवारी गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे पहावयास मिळत आहे. याही वर्षी चौथ्या सोमवार निमित्त शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी साठी भाविकांनी राञी बारा वाजे पासुनच दर्शन रांगेत उभे होते.

शेवटच्या चौथ्या श्रावणी सोमवारी महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, व यांच्या पत्नी शालिनी ताई विखे, खासदार राजन विचारे, वनमंञी सुधिर मुंनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे सचिन आहेर यांनी पविञ शिवलिंगाचे दर्शन घेतले घेतले.

भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.सुरेश कौदरे उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्ञी गवांदे विश्वस्त रत्नाकर कोडीलकर, दत्ताञय कौदरे, गोरक्ष कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Gautam Gambhir: 'लोकांनी आमच्या क्षेत्रात नाक खुपसू नये, आम्ही...', वनडे मालिका जिंकल्यानंतर IPL मालकावर भडकला गंभीर

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT