Rupali Patil Thombare Eknath Shinde Sakal
पुणे

Pune News : पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या रुपाली पाटील थेट CM शिंदेंच्या भेटीला

मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा पेठची जागा रिकामी झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नागपुरात भेट घेतली. पुण्यात कसबा पेठेतून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असल्याचं विधान केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या.

रुपाली पाटील ठोंबरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नागपुरामध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदनही दिलं. खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी शेवाळे यांच्याविरोधातले पुरावेही रुपाली पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले.

राहुल शेवाळे यांच्यावर एका तरुणीने बलात्कार आणि अत्याचाराचा आरोप केला होता. हा विषय राज्याच्या हिवाळी अधिवेशनात चांगलाच पेटला होता. या तरुणीचे दाऊदशी संबंध असल्याचं राहुल शेवाळेंनी सांगितलं होतं. त्यानंतर आज पुन्हा या तरुणीने राहुल शेवाळेंचं पाकिस्तान, कराची कनेक्शन असल्याचे आरोप केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Government Employees Salary : केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांना दिलासा; २५ सप्टेंबरलाच वेतन-पेन्शन जमा होणार

Bank Update: रविवारीही बँका राहणार सुरू! सरकार आणि RBIचा मोठा निर्णय

Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

गणपती विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; दीपक वागसकर यांचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा पोलिसांवर आरोप | Ahilyanagar, Bhingar

Vivo Smartphone: 10,000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्लेसह येतोय Vivo S2 FE 5G; पाहा दमदार फीचर्स अन् किंमत...

SCROLL FOR NEXT