cm sakal media
पुणे

सरकार व शिवसेना तुमच्या पाठीशी : उद्धव ठाकरे

धोंडीबा कुंभार

पिरंगुट : "आम्ही तुम्हाला काही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार व शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. जी मदत लागेल ती देण्यात येईल." अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ढेबे व मरगळे कुटुंबांना आधार देऊन त्यांचे सांत्वन केले. उरवड़े (ता. मुळशी) येथील एसव्हीएस अॅक्वा कंपनीतील आगीच्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या खारावडे (ता. मुळशी) येथील सुमन ढेबे व मंगल मरगळे यांच्या कुटुंबियांची आज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी गोऱ्हे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन लावून मृतांचे नातेवाईक माऊली ढेबे यांच्याशी संवाद साधायला लावला. त्यावेळी ठाकरे यांनी ढेबे व मरगळे कुटुंबियांशी संवाद साधून आधार दिला. त्यानंतर गोऱ्हे यांनी लगेचच दोन्ही कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रुपये दोन्ही कुटुंबियांकडे प्रत्येकी पंचवीस हजार रुपये सूपूर्त केले.

यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान गोऱ्हे यांनी उरवडे येथील दुर्घटनाग्रस्त कंपनीच्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली व प्रांत संदेश शिर्के , तहसीलदार अभय चव्हाण व पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांचेशी चर्चा करून माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT