Dilip Deshmukh as Chief District Judge of Washim
Dilip Deshmukh as Chief District Judge of Washim 
पुणे

सह धर्मादाय आयुक्त देशमुख वाशिमच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशपदी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांची वाशिम येथे पदोन्नतीने प्रमुख जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वाशीम येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए.जी. बिलोलीकर हे येत्या 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. 

देशमुख यांनी मागील दोन वर्षांच्या कालावधीत गरीब, गरजू लोकांच्या मदतीसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यांनी धर्मादाय संस्था, देवस्थाने यांच्या माध्यमातून गरीब, गरजू युवक-युवतींसाठी सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले. आठ कोटी लिटर पाणीसाठा क्षमतेचा बंधारा उभारला. कडेपठार देवस्थानच्या ठिकाणी रोपवे बांधण्यात येत आहे. एक हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये शैक्षणिक मदत केली. बीड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या कालावधीत टॅंकरने पाणी पुरवठा करण्यासाठी आर्थिक सहाय्य, गोशाळा, चारा छावण्या सुरू केल्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या कालावधीत धर्मादाय देवस्थानांना रुग्णांच्या उपचारासाठी दानपेट्या खुल्या करण्याचे आवाहन केले होते. त्याला देवस्थान आणि संस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यातून ससून रुग्णालयाला दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. दोन लाख होमिओपॅथी अर्सेनिक गोळ्या उपलब्ध करून दिल्या. तसेच, 50 हजार नागरिकांना दररोज दोन महिने जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली. याशिवाय बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामधील महिलांना धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून दररोज मोफत जेवण आणि साड्यांचे वाटप करण्यात आले. 

पुण्यातील कार्यकाळ हा अतिशय चांगला गेला. पुणेकरांचा विश्वास आणि सहकार्यामुळे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आणि गरजू व्यक्तींना मदत करणे शक्‍य झाले. पुणे विभागात विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविणे शक्‍य झाले. त्याचे सर्व श्रेय पुणेकरांना जाते. 
- दिलीप देशमुख, सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT