पुणे

पुणे, पिंपरीमधील पावणेदोनशे पतसंस्था तोट्यात!

अनिल सावळे

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश सहकारी पतसंस्थांची आर्थिक स्थिती चांगली असली तरी एकूण पतसंस्थांपैकी सुमारे पावणेदोनशे पतसंस्था सध्या तोट्यात आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. दरम्यान, एखादी पतसंस्था सातत्याने तोट्यात येऊन अडचणीत येण्यापूर्वी त्यांचा कारभार वेळीच सुधारता यावा, यासाठी सरकारने नेमलेल्या राज्यस्तरीय समितीचे काम संथ गतीने सुरू आहे.

पाच-सहा वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, जळगाव येथील बढे सहकारी पतसंस्था अशा मोठ्या आर्थिक उलाढाल असलेल्या पतसंस्थांसह काही पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे हजारो ठेवीदारांचे संसार उद्‌ध्वस्त झाले होते. सहकार विभागातील अधिकारी अजूनही त्या पतसंस्थांच्या संचालक आणि कर्जदारांकडून वसुली करून ठेवीदारांच्या रकमा परत करीत आहेत. राज्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पतसंस्थांचा कारभार वेळोवेळी तपासता यावा, यासाठी राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली; परंतु या समितीमधील अधिकाऱ्यांवर कामकाजाचा अतिरिक्‍त ताण आहे. त्यामुळे अशा पतसंस्थांवर कोण ‘वॉच’ ठेवणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील नागरी आणि सेवक सहकारी पतसंस्थांची आर्थिक स्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक आहे. मात्र, तोट्यात येणाऱ्या पतसंस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ठेवीदार-सभासदांकडून करण्यात येत आहे.  

सहकारी पतसंस्थांचा तोटा हा आर्थिक व्यवहारातील नाही. अनुत्पादक (एनपीए) कर्जाच्या थकीत व्याजासाठी जी रक्‍कम तरतूद करावयाची असते, ती जास्त करावी लागल्यामुळे हा तोटा दिसून येतो. तसेच, आगामी काळात पतसंस्थांच्या सभासदांना ठेव सुरक्षिततेसाठी विमा संरक्षणाचे कवच मिळणार आहे. 
- काका कोयटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT