कोळसा वाहतुकीच्या ट्रकला आग
आनेवाडी टोलनाक्याजवळील घटना; सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
आनेवाडी, ता. ४ : पुणे- बंगळूर महामार्गवरील आनेवाडी टोल नाक्याजवळ विरमाडे हद्दीत काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातून मुंबईकडे कोळसा घेऊन जाणारा ट्रक (केए ०४ एबी ३४२३) जात असताना आनेवाडी टोलनाक्याजवळ ट्रकमधील कोळशाने पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने ही बाब ट्रकचालक नासिर खान (रा. तुमकूर, कर्नाटक) याच्या निदर्शनास आणून दिली.
यानंतर संबंधित ट्रक त्वरित विरमाडे (ता. वाई) हद्दीतील सेवा रस्त्यावर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला. दरम्यान, किसन वीर साखर कारखाना, तसेच गरवारे एमआयडीसी येथून अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.
या वेळी टोल नाका व्यवस्थापक अविनाश फरांदे यांच्या समन्वयाने, तसेच भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली आग आटोक्यात आणण्यात आली. जोशीविहीर येथील वाहतूक पोलिस कर्मचारी सुशांत धुमाळ, विरमाडेचे पोलिस पाटील सचिन सोनावणे, तसेच स्थानिक युवकांनी प्रसंगावधान राखून मदतकार्य केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रकमधील काही प्रमाणात कोळसा जळाल्याचे समजते.
-------------------------------------
02416
विरमाडे : येथे ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाचे कर्मचारी. (प्रशांत गुजर : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.