प्रतिकात्मक छायाचित्र Representative image
पुणे

कोब्राशी लढला कुत्रा; जिवाची बाजी लावत वाचवले अनेकांचे प्राण

नामदेव कुंभार

तुम्ही सर्वांनी अनेकदा कुत्र्यांच्या निष्ठेचे किस्से ऐकले असतील अथवा चित्रपटात पाहिलेही असतील. कुत्र्याच्या इमानाची अशीच एक घटना समोर आली आहे. पुण्यातील वडगाव शेरीमध्ये कुत्रा चक्क कोब्रासोबत लढला. नुसता लढलाच नाही, तर स्वत:च्या प्राणाची बाजी लावत कोब्राला संपवलं. कोब्राने कुत्र्याच्या पायाचा दोन वेळा चावा घेतला. वेदनेत असतानाही कुत्र्याने लढायचं सोडलं नाही, अखेर कोब्राला संपवलेच.

वडगाव शेरीमधील ब्रम्हा सनसीटीच्या ग्रार्डनसमोर कुत्रा आणि कोब्रा यांच्यातील संघर्ष झाला. कुत्र्याने जिवाची बाजी लावत अनेकांचे प्राण वाचवले. या गार्डनमध्ये लहानग्यांपासून वृद्धापर्यंत फेरफटका मारण्यासाठी येतात. सकाळच्या वेळी कोब्राला पाहिल्यानंतर सापाने त्याच्यावर हल्ला चढवला. कुत्रा बेशुद्धअवस्थेत पडला होता. त्याचवेळी तिथं उपस्थित असणाऱ्या नागरिकाने सर्पमित्र आणि प्राणीमित्रांना याविषयीची माहिती दिली. कुत्र्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरु असताना त्याने प्राण सोडले.

जिवाची बाजी लावत कोब्रासारख्या विषारी सापाविरोधात लढा देत कुत्र्याने प्राण सोडले. कुत्रा खरंच खूप धैर्यवान होता, अशी प्रतिक्रिया प्राणीमित्रांनी दिली. गार्डन आणि परिसरातून फिरणाऱ्या अनेकांचे प्राण कुत्र्याने वाचवले. येथील नागरिकांनीही कुत्र्याला भावूक आंतकरणाने अखेरचा निरोप दिला. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असल्याचे अनेक किस्से ऐकतच असतो. पण, त्याला दुजोरा देणारी एक घटना वडवाग शेरी येथे घडल्याची प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT