पुणे

अवघ्या चार दिवसांत २० लाख सदस्य

CD

अवघ्या चार दिवसांत
वीस लाख सदस्य!

कॉकरोच जनता पार्टी देशभरात चर्चेचा विषय

मुंबई, ता. २० : सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी बेरोजगार तरुणाईला ‘झुरळ’ संबोधल्यानंतर देशभरातून टीका झाली. त्यातूनच कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) ही सोशल मीडियावर सुरू झालेली व्यंगात्मक राजकीय चळवळ चर्चेचा विषय ठरत आहे. अवघ्या चार दिवसांत सीजेपीचे २० लाखांहून अधिक सदस्य झाले असून, भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रेंडपैकी एक बनली आहे. इन्स्टाग्रामवर केजीपीचे ७० लाखांहून अधिक, तर ‘एक्स’वर जवळपास एक लाख फॉलोअर्स आहेत.
नोंदणीकृत राजकीय पक्ष नसतानाही, कॉकरोच जनता पार्टी डिजिटल विश्वात आंदोलनाचे प्रतीक म्हणून चर्चेचा विषय ठरत आहे. मीम्स, संताप आणि राजकीय संदेशाच्या माध्यमातून युवकांच्या प्रश्नावर समर्पकपद्धतीने भाष्य करीत असल्याने केजीपीला तरुणाई, राजकीय नेते तथा अनिवासी भारतीयांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही चळवळ बोस्टन विद्यापीठात जनसंपर्क विषयाचा अभ्यास करणाऱ्या आणि ‘आप’च्या माजी सोशल मीडिया स्वयंसेवक असलेल्या ३० वर्षीय अभिजित दीपके यांनी सुरू केली.
---
आळशी, बेरोजगारांचा आवाज
‘सीजेपी’ने संकेतस्थळावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. व्यवस्थेने मोजायला विसरलेल्या तरुणाईसाठी आम्ही काम करीत आहोत. पक्षाचा सदस्य होण्यासाठी आळशी, बेरोजगार, सतत ऑनलाइन असणारे तसेच संताप व्यक्त करण्यास सक्षम असणे हीच आवश्यक पात्रता असल्याचे उपरोधिकपणे नमूद केले.
----
पाच कलमी जाहीरनामा
१. ‘सीजेपी’ सत्तेत आल्यास सरन्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतर राज्यसभेवर संधी मिळणार नाही.
२. सत्ताधारी वा विरोधी पक्षाच्या राज्यात, कोणत्याही व्यक्तीचे वैध मत रद्द केल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांना अटक केली जाईल.
३. संसदेची संख्याबळ न वाढवता महिलांना ३३ टक्क्यांऐवजी ५० टक्के आरक्षण मिळेल. याशिवाय मंत्रिमंडळातील ५० टक्के पदे महिलांसाठी राखीव असतील.
४. माध्यमांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून अंबानी आणि अदानी यांच्या मालकीच्या सर्व माध्यम संस्थांचे परवाने रद्द केले जातील. गोदी मीडियाच्या अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी केली जाईल.
५. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही आमदाराला किंवा खासदाराला २० वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक लढवण्यास आणि कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT