पुणे

संशोधन, उद्योगासाठी ‘सीओईपी’ने व्यासपीठ करावे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आवाहन ः पदवी प्रदान सोहळा उत्साहात

CD

पुणे, ता. १६ : जगभरात माजी विद्यार्थी असलेल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने संशोधन, शासन आणि उद्योग या तीन घटकांची मोट बांधून, देशाच्या जडणघडणीला मार्गदर्शक ठरेल, असे खुले व्यासपीठ तयार करावे. याद्वारे नव्या पिढीतील संशोधक, अभियंते आणि उद्योजक यांना विविध पातळ्यांवरील प्रश्न सोडवून पुढील वाटचाल करता येईल, असा विश्वास राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी व्यक्त केला.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या तिसऱ्या पदवी प्रदान सोहळ्यात राज्यपाल जिष्णू देव वर्मा बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. यशोधरा व्ही. हरिभक्त आणि कुलसचिव डॉ. दयाराम एन. सोनवणे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, अधिष्ठाता प्रा. पराग सदगिरी, प्रा. सी. वाय. पाटील उपस्थित होते. कुलपतींच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. यावेळी ८८९ विद्यार्थ्यांना पदवी, तर ५८२ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. पदवीच्या १० विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, तर पदव्युत्तर पदवीच्या २५ विद्यार्थ्यांना टॉपर्स म्हणून गौरविण्यात आले.
वर्मा म्हणाले, ‘‘ज्ञान, संस्कृती आणि बुद्धीमत्ता यांचा मिलाफ असलेल्या आणि शिक्षणाची राजधानी असलेल्या पुणे शहरातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक पातळीवरील हे व्यासपीठ संशोधनाचे पेटंट मिळविण्यासाठी देखील मोलाची भूमिका पार पाडेल. विद्यार्थ्यांचे आजचे यश हे केवळ त्यांच्यापुरते किंवा त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित नसून, ते समाज आणि राष्ट्राच्या जडणघडणीत कोणती मोलाची भूमिका बजावू शकेल, असा विचार विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे.’’
पाटील म्हणाले, ‘‘अतिशय विचार करून जून २०२२ मध्ये ‘सीओईपी’ला एकल तंत्रज्ञान विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. तंत्रज्ञान समजणारी आणि ते अंमलात आणणारी पिढी घडविण्यासाठी ‘सीओईपी’ सातत्याने पुढाकार घेत आहे, ही आनंदाची बाब आहे. ‘जेन झी’ला तंत्रज्ञान क्षेत्रात दिशा देण्याचे काम ‘सीओईपी’ करेल, असा मला विश्वास आहे. यासाठी चिखली येथे २८ एकर जागेत आयआयटीच्या दर्जाचे संशोधन केंद्र ‘सीओईपी’ विकसित करीत आहे. पदवीऐवजी सध्याच्या पिढीचा कल छोट्या अभ्यासक्रमांकडे असून, नजीकच्या काळात ग्रामीण विद्यार्थ्यांना अर्थाजनसाठी सक्षम करणाऱ्या छोट्या अभ्यासक्रमांची देखील आखणी करणे आवश्यक आहे. यातून संशोधक आणि कल्पक उद्योजक निर्माण होतील.’’
पै म्हणाले,‘‘जागतिक पातळीवरील सुविधा विद्यार्थ्यांना देण्यासाठी ‘सीओईपी’ कायमच प्रयत्नशील आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा परिसर संशोधकांचा परिसर म्हणून विकसित करण्याकडे कल आहे.’’ यावेळी प्रा. भिरूड यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदिनी अय्यर आणि डॉ. क्षिप्रा मोघे यांनी केले.

चारशे विद्यार्थिनींसाठी वसतिगृह
‘सीओईपी’मध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृह बांधणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. पुढील महिन्यापासून त्याचे प्रत्यक्ष काम हाती घेण्यात येणार असून, येत्या जूनमध्ये हे वसतिगृह कार्यान्वित होईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT