Cold sakal
पुणे

पुणे शहरात थंडीचा कडाका वाढला

संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे असल्यामुळे पुढील चार दिवस म्हणजेच रविवार (ता.१४) पर्यंत शहर आणि परिसरात थंडी कायम राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढला असून, मंगळवारच्या (ता. ९) तुलनेत बुधवारी सकाळी शहरातील सर्वच भागातील किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसची घट झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पहाटे बहुतेक भागात कडाक्याच्या थंडीबरोबरच धुके पडल्याचेही पाहायला मिळाले. बुधवारी शहरात सर्वात कमी तापमान शिवाजीनगर येथे ११.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे असल्यामुळे पुढील चार दिवस म्हणजेच रविवार (ता.१४) पर्यंत शहर आणि परिसरात थंडी कायम राहणार आहे. रविवारनंतर मात्र ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात किंचितशी वाढ होत, थंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुण्यासह राज्यभरात थंडीने जोर धरला आहे. शहरात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळाले. शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव येथे सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअस घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या सुमारास शहरात मोठ्या प्रमाणावर थंडी पडत आहे. पुढील काही दिवस आकाश निरभ्र, हवामान कोरडे राहणार असून, या काळात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाल्याचे पाहायला मिळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)

ठिकाण : मंगळवार - बुधवार

शिवाजीनगर : १२.७ - ११.८

लोहगाव : १५.० - १४.२

पाषाण : १३.४ - १२.६

चिंचवड : १८.१ - १७.६

लवळे : १७.९ - १६.२

मगरपट्टा : १९.१ - १८.८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : मराठ्यांनो, १५ तारखेला मी एकटाच मुंबईला जातोय, आता मला कोण आडवतोय ते बघतोच, मनोज जरांगे यांचा इशारा

SCROLL FOR NEXT