पुणे

दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा लाट येण्याचा हवामान खात्याचा इशारा

CD

उत्तर भारतात थंडीचा लाट येण्याचा इशारा
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.२ : दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून दाट धुक्याचा प्रकोप देखील वाढण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी होत असल्यामुळे उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी तापमान साडेचार ते साडेसहा अंश सेल्सिअसपर्यंत कमी होऊ  शकते. दिल्लीत सहा जानेवारीपर्यंत दाट धुके राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात थंडी आणि प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त आहेत. गुरुग्राम येथे शुक्रवारी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) २३२ इतका नोंदवला गेला. नोएडा आणि फरिदाबादमध्ये हा निर्देशांक क्रमश: २९९ आणि २२० तर तर गझियाबादमध्ये तो ३०० इतका नोंदवला गेला. दिल्लीतील द्वारका येथे हा निर्देशांक सर्वाधिक म्हणजे ४२३ इतका नोंदवला गेला आहे. उत्तराखंडमध्ये हरिद्वारच्या परिसरात दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेशात आग्रा, अयोध्या, प्रयागराज, कानपूर या ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. पूर्व भारतात ओडिशामध्ये धुक्याचे प्रमाण वाढले असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.  धुक्याचा परिणाम हवाई आणि रेल्वे वाहतुकीवर झाला असून कमी दृश्यमानतेमुळे अनेक विमानांचे उड्डाण रद्द करावे लागले. दुसरीकडे ८० पेक्षा जास्त रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात ठेवत प्रमुख मार्गावर गाड्यांचा वेग कमी करण्यात आल्याचे उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू शेखर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Beed RTE Admission, Fake Rent Agreements: आरटीई प्रवेशासाठी बनावट भाडेकरार? बीडमध्ये शाळेजवळ ‘पत्ता’ मिळवण्याची स्पर्धा

Kolhapur Gas Cylinder Shortage : कोल्हापुरात सिलिंडरसाठी रांगा, नागरिकांचे उन्हातान्हात प्रचंड हाल; प्रशासनाची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT