Rajesh-Deshmukh 
पुणे

थुंकणाऱ्या आणि धूम्रपान करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आणि संबंधित विभागांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या आणि धूम्रपान करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बुधवारी आयोजित जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. सुहासिनी घाणेकर, जिल्हा सल्लागार डॉ. राहुल मणियार उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘तंबाखूचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करावी. कायद्याबाबत नियमित प्रशिक्षणावर भर द्यावा. नागरिकांनीही अशा पदार्थांचे सेवन टाळणे गरजेचे आहे. नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. सरकारी कार्यालये, पोलिस ठाण्यासह इतर कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी संबंधित कार्यालय प्रमुखांनी प्रयत्न करावेत. शिक्षक हे विद्यार्थ्यांसमोर आदर्शस्थानी असल्यामुळे शिक्षकांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करता कामा नये. ‘तंबाखू मुक्त शाळा अभियान’ यशस्वीपणे राबविण्यासाठी शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेने नियोजन करावे,’’ असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

Udgir Crime : जेवणाच्या बहाण्याने घरात घुसून महिलेवर अत्याचार; आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

युद्धामुळे महागाईचा भडका, सरकारने एक कोटीची नोट छापली, पण बाजारात पिशवीही भरणार नाही; इराणची अर्थव्यवस्था संकटात

विजय वडेट्टीवार यांच्यावर शंभर कोटींच्या मानहानीचा दावा; कुणी दाखल केली याचिका? नेमकं प्रकरण काय?

SRH Viral Video: सिलेक्टर्स ऐकतायेत, जरा सांभाळून... इशान किशनची सर्वांसमोर नितीश रेड्डीला वॉर्निंग; अभिषेक शर्मालाही लागला हसू

SCROLL FOR NEXT