Collector enquire about 80 lacs Provided to haveli District for food in emergency Situation 
पुणे

80 लाखांचे झाले काय? जिल्हाधिकारी तातडीने करणार चौकशी

निलेश बोरुडे

किरकटवाडी(पुणे) : कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत गरजू नागरिकांना अन्नधान्य व इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हवेली तालुक्यासाठी देण्यात आलेल्या व खर्च झालेल्या 80 लाखांचे नेमके झाले तरी काय? याचे उत्तर हवेली महसूल प्रशासन देत नसल्याने कोरोना सारख्या आपत्तीच्या काळातही लोक अडचणीत असताना अधिकाऱ्यांनी गैरकारभार केला का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने चौकशी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हवेली तालुक्यात एकूण आठ महसूल मंडळं आहेत. हवेली तालुक्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एकूण 1 कोटी 30 लाख रुपये संकटात असलेल्या नागरिकांना जेवण व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वर्ग करण्यात आले होते. त्यापैकी 80 लाख खर्च करण्यात आले तर 50 लाख जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी इतर खर्चासाठी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागवून घेतले.

मध्य पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना मिळणार दिलासा? कॉंग्रेसने केली ही मागणी

हवेली तालुक्यातील खडकवासला महसूल मंडळासाठी किती रुपये खर्च करण्यात आले व किती लोकांना तहसील कार्यालयाकडे आलेल्या निधीतून मदत देण्यात आली याबाबत खडकवासला मंडलाधिकारी रोहिदास जाधव यांच्याकडे विचारणा केली असता कोणतीही माहिती त्यांना देता आली नाही. हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांच्याकडे याबाबत वारंवार विचारणा करण्यात आली परंतु त्यांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेली तयार अन्नाची पाकिटे व काही समाजसेवी संस्थांनी दिलेले अन्नधान्याचे किट काही गावांमध्ये वाटण्यात आले मग, तहसीलदारांकडे आलेल्या 80 लाखांच्या निधीचे झाले तरी काय? याचे उत्तर मात्र मिळायला तयार नाही. जर सर्वसामान्य लोकांच्या नावाने प्रशासनाकडून मदत येत असेल आणि ती खर्च होऊनही गरजू लोकांपर्यंत पोचत नसेल तर यामध्ये गैरकारभार झाल्याची शक्यता जाणवत आहे. जर अशा आपत्तीच्या काळात असे झाले असेल तर ही आपल्या शासकीय व्यवस्थेची मोठी शोकांतिका असणार आहे. आता संबंधित अधिकाऱ्यावर योग्य चौकशी करून वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे येणारा काळच ठरवणार आहे.

पुढील सहा महिने घरूनच काम; पुण्यातील आयटी कंपन्यांचे धोरण

"याबाबत योग्य ती माहिती घेतली जाईल.अशा परिस्थितीत जर काही गैरकारभार झाल्याचे आढळल्यास दोषींवर कडक कारवाई केली जाईल," सचिन बारवकर,
- उपविभागीय अधिकारी, हवेली उपविभाग.

"याबाबत तातडीने चौकशी करणार आहे व पुर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल ,"
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT