naval-kishore-ram
naval-kishore-ram 
पुणे

जिल्हाधिकाऱ्यांनी कसली कंबर; मांजरी गाव कोरोनामुक्त करण्यावर भर!

सकाळवृत्तसेवा

पुणे - गावात कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा ताबडतोब शोध घेऊन त्यांना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात यावे. नमुना तपासणी अहवाल आल्यानंतर निगेटिव्ह अहवाल असणाऱ्यांना होम क्वारन्टाईनचा शिक्का मारुन घरी पाठविण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत. हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक येथे जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. 

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने नियमांची कडक अंमलबजावणी करुन मांजरी बुद्रुक गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यासाठी भर द्यावा. कोरोना बाधित गंभीर रुग्णांसाठी लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात जास्तीत जास्त व्हेंटीलेटर बेड आणि आयसीयु बेडच्या व्यवस्थेबाबत लवकरात लवकर नियोजन करावे. यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती मदत करेल. कोरोना बाधित रुग्णामुळे इतरांना प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी. क्वॉरन्टाईन असणाऱ्यांची दररोज ऑक्सीमीटरव्दारे तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार चेतन तुपे, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते, 
पोलिस निरीक्षक रमेश साठे, सहायक निरीक्षक मनोज पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा देशपांडे, सरपंच शिवराज घुले, उपसरपंच सुवर्णा कामठे, ग्रामसेवक मधुकर दाते, समन्वयक ए.बी.मोरे या वेळी उपस्थित होते.

नियम न पाळणार्‍यांवर गुन्हा -
गावात कोणी नियम पाळत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणांनी गावातील कोरोना विषयक आकडेवारी दररोज अद्ययावत करुन ठेवली पाहिजे. प्रतिबंधित क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे. कोरोना प्रतिबंधासाठी मांजरी गावासाठी मास्क, सॅनिटायझर साहित्याची आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा. गावपातळीवर कोरोनाविषयक जनजागृती करण्यावर भर द्यावा, अशा सूचना राम यांनी दिल्या. 

मार्केट कमिटीमध्ये जागा द्यावी - आमदार तुपे
आमदार चेतन तुपे म्हणाले, "शेतकऱ्यांना व्यवसायासाठी मार्केट कमिटीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात यावी. कोरोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेण्यावर भर दिला पाहिजे. कोरोना प्रतिबंधासाठी आपण सर्वजण मिळून चांगले काम करु."

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT