पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या विशेष फेरीसाठी जवळपास आठ हजार ४१९ विद्यार्थी पात्र ठरले. त्यातील जवळपास पाच हजार ५५५ विद्यार्थ्यांना दुसऱ्या विशेष फेरीत प्रवेश देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या पुढील कार्यवाहीचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी बुधवारी (ता. ६) ते शुक्रवार (ता. ८) या कालावधीत 'प्रोसिड फॉर ऍडमिशन' आणि प्रवेश निश्चित करता येणार आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश निश्चित करता येणार आहे.
घेतलेला प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारता येणे, या सुविधाही उपलब्ध आहेत. तसेच सर्व तीनही कोटांतर्गत प्रवेश व रिक्त जागांचे प्रत्यार्पण सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रक्रियेत झालेले प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदविण्यासाठी महाविद्यालयांना ८ जानेवारीपर्यंत अतिरिक्त वेळ दिला आहे. तर प्रवेशाची विशेष फेरी पूर्ण झाल्यानंतर शनिवारी (ता.९) रिक्त जागांचा तपशील करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.