Vinod Pravin Bhosale sakal
पुणे

Crime News : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा चौघांनी सिनेमा स्टाईल्सने कोयता व कु-हाडीने वार करुन केला खून

उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे कारखेलच्या चौघांनी सिनेमा स्टाईल्सने कोयता व कु-हाडीने वार करुन एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा निर्घूण खून केला.

विजय मोरे

उंडवडी - उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे कारखेलच्या चौघांनी सिनेमा स्टाईल्सने कोयता व कु-हाडीने वार करुन एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा निर्घूण खून केला. आरोपीमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही घटना आज (ता. १८ ) गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान घडली. विनोद प्रवीण भोसले (वय- १७ वर्षे )असे खून झालेल्या दुर्दैवी महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे.

या घटनेतील चारही आरोपींना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यामध्ये तिघेजन अल्पवयीन असून एकजण १८ वर्षाचा आहे. वैभव राजेंद्र भापकर (वय-१८) यश विलास मांढरे (वय-१७) सुमित आबासो भापकर (वय-१७) सुयश भानुदास भापकर (वय-१७) रा. सर्वजण कारखेल (ता. बारामती) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कारखेल (ता. बारामती) येथील विनोद प्रवीण भोसले (वय-१७) हा युवक श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पोलटेक्निकला इयत्ता बारावीमध्ये (सायको-संगणक) शिक्षण घेत होता. तो आज साडे पाच वाजता एस.टी. ने घराकडे येत होता.

उंडवडी सुपे येथे एस.टी. बसमधून उतरल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या पूलाखाली दबा धरुन बसलेल्या चौघांनी विनोद भोसले याच्यावर कोयता व कु-हाडीने थेट हल्ला केला. विनोद चौघांच्या तावडीतून जीव वाचविण्यासाठी जोर -जोरात ओरडत बाजूच्या शेताकडे पळाला. मात्र पळत असताना विनोदवर एक वार झाल्याने तो घायाळ झाला. आणि शेतात सापडला. मग चौघांनी विनोदवर सपासप कोयत्याने आणि कु-हाडीने वार केले.

यामध्ये विनोदचा जाग्यावरच मृत्यू झाला. घटनेनंतर चौघांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. चौघेही एकाच गावातील असून गावातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात आपसात किरकोळ वाद झाल्याच्या पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याचे ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

घटनेनंतर तातडीने घटनास्थळावर सुपे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी भेट देवून आरोपीना ताब्यात घेतले. व घटनास्थळाचा पंचनामा करुन घटनेची माहिती घेतली. या घटनेतील चार आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT