पुणे

कोथरूड परिसरामध्ये ‘कोम्बिंग ऑपरेशन’

सकाळवृत्तसेवा

पुणे - वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कोथरूड परिसरात गुरुवारी (ता.७) रात्री ‘कोम्बिंग ऑपरेशन’ केले. या मोहिमेत २२ सराईत गुन्हेगारांची तपासणी करून त्यापैकी एकास तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. 

परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्री कोथरूडमधील सुतारदरा भागामध्ये हे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक खटके, कोथरूड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांच्यासह तीन पोलिस निरीक्षक आणि १५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने सुतारदरा परिसरात राहणाऱ्या सराईत गुन्हेगारांची तपासणी केली. त्यामध्ये सराईत गुन्हेगारांच्या घरी जाऊन त्यांची माहिती घेण्यात आली. या वेळी समीर अशोक ढोकळे (वय २३, सुतारदरा, कोथरूड) हा सराईत गुन्हेगार पोलिस प्रशासनाने तडीपारीचा आदेश दिलेला असतानाही परिसरात वास्तव्य करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार ढोकळे यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध  गुन्हा दाखल केला.

पर्वती भागातील गुंड तडीपार
शहराच्या वेगवेगळ्या भागांत खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, हाणामारी, दरोड्याचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे करण्याबरोबरच दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदिनाथ सोपान साठे (वय २४) या सराईत गुन्हेगारास पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.  

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT