पुणे

बारामतीतील शारदा प्रांगणात कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु

मिलिंद संगई

बारामती : शहरातील नगरपालिकेसमोरील शारदा प्रांगणातील शाळेमध्ये आजपासून (ता. 5) कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु झाल्याने बारामतीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, आरोग्य विभाग व बारामती नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. 

एमआयडीसीतील शासकीय महिला रुग्णालयात लसीकरणासाठी लोकांना जावे लागत होते. हे रुग्णालय शहरापासून दूर अंतरावर असल्याने अनेक जण लसीकरणासाठी जाण्यास टाळाटाळ करत होते, ही बाब लक्षात घेत शहरातील शारदा प्रांगणात लसीकरण सुरु व्हावे या साठी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी पुढाकार घेतला होता.

स्वताः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आरोग्य विभागास या बाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या नुसार आजपासून हे लसीकरण सुरु झाले. शारदा प्रांगण बारामती शहराला मध्यवर्ती असल्याने अनेक लोक येथे येऊन लसीकरण करताना पहिल्याच दिवशी दिसले. या ठिकाणी सर्व यंत्रणा उपलब्ध असून लसीकरणानंतर काही काळ नागरिकांना निरिक्षणाखाली ठेवले जात होते, या शिवाय त्यांना गोळ्याही दिल्या जात आहेत. 

या ठिकाणी ऑनलाईन पध्दतीने नोंदणीची सुविधा देण्यात आली असून डॉक्टर, परिचारिका व इतर सहकारी लसीकरण वेगाने करण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी या लसीकरण केंद्रास भेट दिली. उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, किरण गुजर, सुधीर पानसरे, अभिजीत चव्हाण आदींनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. 

फोटो- बारामती- येथे शारदा प्रांगणात सोमवारपासून लसीकरण केंद्र सुरु झाले. लसीकरणाची पाहणी करताना उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे व नगरसेवक किरण गुजर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

India Sports Economy: भारतीय क्रीडा अर्थव्यवस्था २०० कोटी डॉलर पार; २०२५ वर्षामध्ये १३.४% वाढ; क्रिकेटचा वाटा सर्वाधिक ८९ टक्क्यांचा

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Chhatrapati Sambhajinagar: जुन्या शहरात पुन्हा धावणार स्मार्ट बस – पर्यटक व नागरिकांसाठी सुविधा वाढवणार

Yavatmal News : एमपीएससी पूर्वतयारी परीक्षेत यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT