SGW26B09332
सांगोला : येथील सांगोला महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील प्रश्नमंजूषा स्पर्धेचे उद्घाटन करताना प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व प्रा. डॉ. राम पवार. यावेळी उपस्थित इतर.
सांगोला महाविद्यालयात कॉमर्स कार्निवल
.......
सांगोला, ता. २३ : सांगोला महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने ‘कॉमर्स कार्निवल २०२५-२६’ चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, आत्मविश्वास वाढावा, संघभावना व नेतृत्वगुण विकसित व्हावेत या उद्देशाने प्रश्नमंजूषा, पोस्टर प्रेझेंटेशन व पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आल्या.
प्रश्नमंजूषा स्पर्धेचे उद्घाटन प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व प्रा. डॉ. राम पवार यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत सुमारे १७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. परीक्षण प्रा. डॉ. सदाशिव देवकर व प्रा. सुरेखा गायकवाड यांनी केले. पी. पी. टी. प्रेझेंटेशन स्पर्धेचे उद्घाटन संस्था निमंत्रित कार्यकारिणी सदस्य सुरेश फुले यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात, असे त्यांनी सांगितले. परीक्षण प्रा. डॉ. ओंकार घाडगे व प्रा. डॉ. जमीर तांबोळी यांनी केले.
तर पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे उद्घाटन प्रा. प्रशांत धनवे व प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते झाले. परीक्षण प्रा. डॉ. मालोजी जगताप व
विद्या पाटणे यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रा. प्रशांत धनवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पुस्तकी ज्ञान जितके आवश्यक आहे तितकेच विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न होण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळणे गरजेचे आहे. विविध क्षेत्रात कार्य करताना आत्मविश्वासासोबतच प्रात्यक्षिक ज्ञानही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी सुर्यागण यांनी केले. प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. विद्या जाधव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सिमा मिसाळ यांनी मानले. यावेळी सृष्टी खंडागळे, वैष्णवी मोरे, मयूरी सावंत, जीवन व्हनमाने व योगीराज थोरबोले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, प्रा. डॉ. रामचंद्र पवार, कार्यालयीन अधीक्षक विलास माने, विभागप्रमुख प्रा. डॉ. विद्या जाधव, प्रा. समाधान माने, प्रा. सचिन सुरवसे, प्रा. प्राप्ती लामगुंडे, प्रा. निकिता लामगुंडे तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.