Commission sends notice to Sharad Pawar for presenting witness for Elgar Parishad  
पुणे

एल्गार प्रकरणी साक्षीसाठी शरद पवार यांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या तपासाबाबत नेमण्यात आलेल्या आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी ४ एप्रिलला उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. तसेच या तारखेत बदल होणार नाही अथवा पुढची तारीख मिळणार नसल्याचे या नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे.

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. यातील 9 जण सध्या अटकेत आहेत.

दरम्यान, शरद पवार यांनी या गुन्ह्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने हा गुन्हा एनआयएकडे सोपवला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शरद पवार यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने चौकशीसाठी बोलवावे अशी मागणी केली होती. त्यानंतर आयोगाने पवार यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs PBKS Live: पंजाबच्या यष्टिरक्षकाने सहकाऱ्याला चेंडू फेकून मारला... मग काय, गडी पेटला अन् पुढच्या ३ चेंडूंत धिंगाणा घातला

Ambajogai News : स्वारातीच्या पदव्युत्तर विद्यार्थ्याने संपविले जीवन; कारण अस्पष्ट

IPL 2026 : हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स, MI vs RR सामना खेळणार की नाही? मुंबईच्या कोचचे वैभव सूर्यवंशीबद्दलही विधान

Nanded Crime News: 3 दिवसात ५ खून, नांदेड हादरलं, अशोक चव्हाण आक्रमक..

Baramati By Election: बॅनरबाजी चर्चेत, आदिती तटकरे चांगल्याच चिडल्या...

SCROLL FOR NEXT