Tukaram Supe Sakal
पुणे

परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे करोनाबाधित

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहारात अटकेत असलेले आरोपी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहारात अटकेत असलेले आरोपी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पुणे - शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) (TET Exam) गैरव्यवहारात अटकेत असलेले आरोपी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. सुपे यांना उपचारांसाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात यावे असा अर्ज सुपे यांच्या वकिलांकडून शुक्रवारी न्यायालयात सादर करण्यात आला.

सुपे कोरोनाबाधित असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले असून त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात यावे. उपचाराचा खर्च सुपे करण्यास तयार आहेत, असा अर्ज सुपे यांचे वकील ॲड. मिलिंद पवार, ॲड. योगेश पवार, ॲड. विश्वास खराबे यांनी न्यायालयात सादर केला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी अर्ज दाखल करून घेतला आहे. या अर्जावर सरकार पक्ष तसेच तपास अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे मांडावे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. या अर्जावर सोमवारी (१० जानेवारी) सुनावणी होणार आहे.

या प्रकरणी पोलिसांनी नाशिक येथून आरोग्य विभागातील एक टेक्निशियन आणि चाळीसगाव येथून जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाला अटक केली आहे. दोघांनी मिळून ३५० परीक्षार्थींकडून तीन कोटी ८५ लाख रुपये घेऊन ते एजंटमार्फेत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात समोर आला आहे. सुरंजित गुलाब पाटील (वय ५०, रा. नाशिक) आणि स्वप्नील तीरसिंग पाटील (रा. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS: पाकची उडाली झोप! 'ब्रिक्स'च्या घोषणापत्रात दहशतवादावर सडकून टीका; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख

बाळाच्या संगोपनासाठी घरात आली मंगल; पण नंतर बदललं सगळंच! ‘अडकित्ता’मध्ये नेमकं काय घडलं? वाचा रिव्ह्यू

Pune Road Inspection: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रस्ते दुरुस्तीचा बोजवारा; मिरवणूक मार्गांवर खड्डे, धोकादायक चेंबर अन् फुटपाथ

Palghar Bus Tragedy: शिवशाही बसच्या डिकीचे झाकण उघडताच शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

SCROLL FOR NEXT