shravan-hardikar
shravan-hardikar 
पुणे

Coronavirus : चमकोगिरी करणाऱ्यांना आयुक्तांकडून आळा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील काही नागरिक, खासगी संस्था व नगरसेवक आपापल्या भागात जंत व कीटकनाशक फवारणी करून चमकोगिरी करीत आहेत. मात्र, असे करणे बेकायदा असून, हा सरकारी आदेशाचा भंग आहे. अशा चमकोगिरीला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फवारणी न करण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेमार्फत आवश्‍यक ठिकाणी फवारणी केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात म्हटले आहे की, शहरातील काही नागरिक, खासगी संस्था व नगरसेवक यांच्याकडून त्यांच्या परिसरात स्वेच्छेने जंत व कीटकनाशक फवारणी केली जात आहे. मात्र, सरकारच्या आदेशानुसार अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी फवारणी करणे बेकायदा असून, कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी फवारणी करण्यास परवानगी नाही. केवळ महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शास्त्रोक्त पद्धतीने आवश्‍यक ठिकाणी फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून फवारणी करण्याची आवश्‍यकता नाही. तसेच, फवारणी करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना कोणत्याही सूचना अथवा मार्गदर्शन करू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT