पुणे

युवा विकास प्रतिष्ठान

CD

समस्या सोडवण्यास प्रशासन जनतेच्या दारी

राजेंद्रसिंह यादव; कऱ्हाडला युवा विकास प्रतिष्‍ठानतर्फे शिबिर

कऱ्हाड, ता. १८ ः शासकीय सेवा अधिक प्रभावी, सुलभ आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने व जनतेच्या समस्या तातडीने सोडवून प्रशासन जनतेच्या दारी पोहचवण्याचा युवा विकास प्रतिष्ठानच्या शिबिराचा उपक्रम निश्चितच सर्वसामान्यांसाठी दिलासादायक असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी केले.
येथील युवा विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शासकीय योजना शिबिरात ते बोलत होते. येथील लाहोटी कन्या प्रशालेत पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या हस्ते शिबिरास प्रारंभ झाला. या वेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विष्णू पाटसकर, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, नगरसेविका तेजश्री पाटसकर, नगरसेवक विजय यादव, प्रवीण पवार, बांधकाम सभापती अख्तर आंबेकरी, नगरसेवक नरेंद्र लिबे, रूपाली माने, गणेश पवार, माजी नगरसेवक राजेंद्र माने, श्री. पेंढारकर, वैभव डुबल, बाळासाहेब उमराणी, अभिजित हापसे, मनोज कुंभार, अजित गायकवाड, महेश सुळे उपस्थित होते.
उपअधीक्षक पाटील म्हणाल्या, ‘‘प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी असून, सर्व नागरिकांना मदत करण्याचे उद्दिष्ट दिसते. आरोग्य व शासकीय योजना शिबिरात १७५६ लोकांनी सहभाग घेतला. विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या विविध समस्या सोडवून शासकीय योजनांची माहिती दिली. संबंधित योजनांचे ऑनलाइन अर्जही दाखल करून घेतले.’’
शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रशासकीय अधिकारी, आरोग्य सेविका, वैद्यकीय कर्मचारी, प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांचे योगदान मिळाले.


W19932
कऱ्हाड ः लाभार्थ्यांना शिधापत्रिका प्रदान करताना राजेंद्रसिंह यादव. त्या वेळी सुदर्शन पाटसकर, तेजश्री पाटसकर, रूपाली माने, विष्णू पाटसकर, नरेंद्र लिबे, रूपेश मुळे आदी.
--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मनमानी पद्धतीने शाळांचे स्थलांतर होणार नाही! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नवे नियम लागू

MS Dhoni आज 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून खेळणार होता, परंतु असं काहीतरी घडलं की...! त्यात, R Ashwin च्या ट्विटने खळबळ

' तो मला किस करतच राहिला आणि ...' प्रिया बापटने सांगितला सेटवरचा अनुभव, म्हणाली...'त्याने मला चुकीच्या ...'

Latest Marathi News Live Update : पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार प्रकरणात दोन आरोपी ताब्यात

साध्या माणसाला अचानक लागली मृत्यूची चाहूल! ८ वाजून १३ मिनिटांनी नेमकं काय घडणार? सुनील बर्वे-ऐश्वर्या नारकर यांची नवी सीरिज

SCROLL FOR NEXT