पुणे

लोक अदालत उद॒घाटन

CD

वाद सामोपचाराने मिटविणे
हे लोकअदालतीचे उद्दिष्ट

न्यायमूर्ती राजेश पाटील : राष्ट्रीय लोकअदालतीला साताऱ्यात प्रारंभ

सातारा, ता. १२ : संवादाच्या माध्यमातून वाद मिटल्याने पक्षकारांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचतो. त्यामुळे नागरिकांमधील वाद सामोपचाराने सोडवणे आणि जलद न्याय मिळेल, असे लोकअदालतीचे उद्दिष्ट असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा जिल्हा पालक न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी सांगितले.
जिल्हा न्यायालयाच्या परिसरात आज राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्‍घाटन न्यायमूर्ती श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले, जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अरविंद एस. वाघमारे, जिल्हा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव प्रियदर्शिनी वाघमारे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष संदीप गायकवाड, तसेच न्यायिक अधिकारी, वकील, विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
न्यायमूर्ती श्री. पाटील म्हणाले, ‘‘लोकअदालतीमध्ये प्रकरण गेले म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीत संपवायचे, असा त्याचा अर्थ नाही. पक्षकारांच्या संमतीने समाधानकारक तोडगा निघत असेल, तरच प्रकरण निकाली काढले जाते.’’ सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी आपापसातील वाद सामंजस्याने सोडविण्यासाठी लोकअदालतीच्या माध्यमाचा अधिकाधिक उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. अरविंद एस. वाघमारे म्हणाले, ‘‘संवादाच्या माध्यमातून वादावर समाधानकारक तोडगा काढणे हा लोकअदालतीचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातत्याने काम करत आहे.’’ जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
....................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Simple Footpath Wedding: अमरावतीत उड्डाणपुलाखाली फुटपाथवर रंगला साधेपणाचा अनोखा विवाहसोहळा; सोशल मीडियावर कौतुकाची लाट

Successful National Lok Adalat: गंगापूर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी; १०७ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा, ८० लाख रुपयांची वसुली

SCROLL FOR NEXT