पुणे, ता. १९ : जिल्हा परिषद शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागाची चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने हवेली पंचायत समितीच्या ‘रयतेची शाळा’ या उपक्रमाची पहिली कार्यशाळा नुकतीच पार पडली. शिक्षक, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांतून दुर्गम भागातील शाळांचाही कायापालट शक्य आहे, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
जिल्हा परिषदेत झालेल्या कार्यशाळेप्रसंगी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्या गायकवाड, सदस्य युवराज वांजळे, शुभांगी खिरिड, मोनिका कंद, गट शिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे आदी उपस्थित होते. दत्तात्रेय वारे, सतीश वाबळे यांनी मार्गदर्शन केले. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील ३६ गावातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच ग्रामस्थांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.
शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांनी केवळ निधी देण्यापेक्षा वेळ, कौशल्य आणि सहभाग देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, यावर कार्यशाळेत भर देण्यात आला. शाळेच्या विकासाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असला पाहिजे. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते शिक्षण न देता स्पर्धा परीक्षा, कौशल्यविकास, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचे शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. ‘रयतेची शाळा’च्या माध्यमातून शाळा ही संपूर्ण गावाची जबाबदारी असल्याची भावना निर्माण करून प्रत्येक गावाने आपल्या शाळेच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना या कार्यशाळेतून देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.