Crime12 
पुणे

धक्कादायक! पैशांचा हिशोब मागत मॅनेजरच्या गुप्तांगावर सॅनिटायझर स्प्रे

वृत्तसंस्था

पुणे : लॉकडाऊनमध्ये दिल्लीत अडकल्यानंतर कंपनीच्या खर्च केलेल्या पैशांची मागणी करत मालकासह तिघांनी व्यवस्थापकास मारहाण केली. तसेच पाय धुतलेले पाणी पिण्यास लावले इतकेच नाहीतर गुप्तांगावर सॅनिटायझर स्प्रे मारुन जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, व्यवस्थापकावर सध्या खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत. 

गणेश रामराव केंजळे, वैभव साबळे, सागर शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी एका 30 वर्षीय नागरिकाने कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीमध्ये नमूद केल्यानुसार, फिर्यादी हे कोथरुडमधील पुणे आर्ट फेस्टिव्हल नावाच्या कंपनीमध्ये पाच महिन्यांपासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मार्च महिन्यात ते कार्यालयीन कामासाठी दिल्ली येथे गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ते दिल्लीत अडकले. त्यांच्याजवळचे पैसे संपल्यानंतर त्यांनी मालकाकडे पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर फिर्यादी यांनी हॉटेलमध्ये कंपनीचा लैपटॉप तारण ठेवला. त्याच पद्धतीने पुण्यात आल्यानंतरही हॉटेलमध्ये राहावे लागल्याने तेथेही त्यांनी कंपनीचा मोबाईल व क्रेडिट कार्ड तारण ठेवले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, 13 जून रोजी फिर्यादी हे त्यांच्या मित्रासमवेत घोटावडे फाटा येथे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी कंपनीचा मालक गणेश केंजळे, त्याचा ड्रायव्हर वैभव साबळे यांनी फिर्यादीस कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्यांच्या कार्यालयात नेले. तेथे केंजळे, सागर शिंदे यांनी फिर्यादीस लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच चिखलाने माखलेले पाय धुण्यास सांगून तेच पाणी पिण्यास भाग पाडले. तर साबळेने फिर्यादीच्या स्प्रेद्वारे गुप्तांगावर सॅनिटायझर मारले. दुसऱ्या दिवशी फिर्यादी यांनी स्वत:ची सुटका करुन घेत पोलिस ठाणे गाठले. तेथे फिर्याद दाखल केली. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

SCROLL FOR NEXT