complaint against Cats on sarathi in pimpri 
पुणे

चक्क ! मांजरी ओरडतात म्हणून 'सारथी' वर तक्रार 

आशा साळवी

पिंपर : हो तुम्ही जे वाचताय ते अगदी खरे आहे ! यापूर्वी तुम्ही भटक्‍या कुत्र्यांचा, डुक्करांचा किंवा मोकाट जनावरांचा त्रास होतो म्हणून तक्रारी केल्याचे वाचले असेल. पण आता रात्रीच्यावेळी भटक्‍या मांजरी रडतात, ओरडतात, म्हणून झोप मोड होत आहे, म्हणून शहरातील सुज्ञ नागरिकांनी चक्क "सारथी' वर तक्रारी केल्या आहेत. सारथीवरील अशाप्रकारच्या तक्रारी अर्जाने महापालिका अधिकारी मात्र चक्रावले आहेत. 


पिंपरी चिंचवड महापालिकेने जनहितार्थ "सारथी'ची सोय केली आहे. यावर नागरिक विविध नागरी समस्यांबाबत बिनधास्तपणे तक्रार दाखल करू शकतात. पण आता या सारथीवर 'भटक्‍या मांजरी' विरोधात सप्टेंबर अखेर दहा तक्रार दाखल झाल्या आहेत. शाहूनगर, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, अजमेरा कॉलनी, आकुर्डी - चिखली, साने चौक आदी परिसरातून मांजरी त्रास देत असल्याच्या तक्रार अर्ज सारथीवर प्राप्त झाले आहेत. रात्री, मध्यरात्री मांजरीच्या आवाजामुळे झोप मोड असल्याच्या गमतीशीर तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकारी म्हणाले, आमच्याकडे मांजरी पकडण्यासाठी पथके नाहीत आणि त्यांची माहितीदेखील आम्ही ठेवत नसल्याचा निर्वाळा दिला. पण वाढत्या तक्रारीमुळे या मांजरांचे काय करायचे, हा प्रश्‍न प्रशासनासोबतच नागरिकांना पडला आहे. 

अशा आहेत गंमतशीर तक्रारी 
पिंपळे सौदागरमधील एका तक्रारदाराने म्हटले, "फास्ट फूड सप्लाय व दुर्गा कॅफेवाले भटकी कुत्री व मांजरींना आकर्षित करणारे अन्न कचरा उघड्यावर टाकत आहे. ते खाण्यासाठी मांजरी जमा होतात. त्यातून त्यांच्यात भांडणे होतात. त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजाचा खूप त्रास होत आहे.'' 

शाहूनगरमधील एका महिलेने तक्रारीत म्हटले, "आमच्या यशलक्ष्मी सोसायटीमध्ये भटक्‍या मांजरींचा वावर खूप वाढला आहे. त्या मांजरी शेजारच्या सोसायटीमधून येत आहेत. रात्रीच्यावेळी मांजरीच्या रडण्याचा आवाज येत असल्याने झोप मोड होतेय, तसेच त्या खिडकीतून घरात प्रवेश करतात. त्यांच्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने भटक्‍या मांजरींना पकडण्यासाठी "पथक' पाठवावे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vertical Property Card : महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांक आणि मालकी हक्कांची सरकारी नोंद मिळणार; महसूल विभागाकडून व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा मसुदा खुला

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

SCROLL FOR NEXT