पुणे

पाळीव कुत्रा दगावल्यामुळे पशुवैद्यकीय डॅाक्टरवर गन्हा दाखल

संदीप जगदाळे

हडपसर - पाळीव कुत्रा दगावल्यामुळे त्याच्या मालकाने पाठपुरावा करून चुकीचे उपचार करणा-या व विनापरवाना पशु रूग्णालय चालविणा-या दोन पशुवैद्यकीय डॅाक्टर व त्यांच्या एका सहाय्यका विरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा व चुकीचे उपचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डॅा. दिलीप सोनुने, डॅा अपुर्वा गुजराथी व सहाय्यक श्रीमती इशीतलाल अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी डॅा. अनिल रामकृष्ण देशपांडे (वय 47, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे 2018 रोजी तुकाईदर्शन येथील योगेश गवळी यांचा कुत्रा आजारी पडला होते. त्यामुळे त्यांनी डीपी रोड येथील माय पेट केअर या पशुवैदयकीय दवाखान्यात त्याला उपचारासाठी नेले. तेथे डॅाक्टर उपल्बध नसताना सहाय्यकाने चुकीचे उपचार केले. 

दुस-या दिवशी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यानंतर गवळी यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी औंध येथील शासकीय पशुवैद्यकीय चिकीत्सालय येथे पंचनामा केला. त्यावेळी सदर कुत्र्याला कावीळ झालेली होती. मात्र त्याच्यावर गॅस्ट्रोचे उपचार करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. हडपसर पोलिसांनी पुढील तपास केला असता सदर दवाखान्यास नागपूर येथील पशुवैदयकीय कौन्सीलची मान्यता नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी दवाखाना सील करून संबधित दोषी असलेल्या तिघांवर गुन्हा दाखल केला. विनापरवाना दवाखाना सुरू केल्याप्रकरणी डॅाक्टरांचा परवाना देखील रद्द करण्यात आला आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हेमचंद्र खोपडे, सहाय्यक निरिक्षक किरण लोंढे, बजरंग धायगुडे यांनी याप्रकरणी तपास केला. 

याबाबत योगेश गवळी म्हणाले, कुत्र्याचे वय दिड महिन्याचे होते. आम्ही घऱातील सर्वजण त्याची प्रेमाने काळजी घेत होतो. घरातील थोरा-मोठयांना त्याचा लळा लागला होता. अचनाक त्याचा मृत्यू झाल्याने सर्वांना हळहळ वाटत आहे. कुत्र्याच्या प्रेमापोटीच पाठपुरावा करून दोषी डॅाक्टर व विनापरवाना डॅाक्टरांना अद्दल घडावी यासाठीच पोलिस ठाण्यात तक्रार दिली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT