Complete the memorial of 'G D Madgulkar' immediately 
पुणे

'गदिमां'चे स्मारक तातडीने पूर्ण करा 

सकाळवृत्तसेवा

पुणे : आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सोमवारी केली. तसेच, सरदार मुजुमदार वाड्याच्या देखभाल-दुरुस्तीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ही दोन्ही कामे प्राधान्याने करण्यात येतील, असे आश्‍वासन राव यांनी या वेळी दिले. 

पुणे-मुंबई रस्त्यालगत मुळा नदीकाठी (वाकडेवाडी परिसर) येथील माधवराव शिंदे उद्यानालगत गदिमांचे स्मारक उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांत याठिकाणी केवळ सीमाभिंत उभारली गेली आहे. स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू केलेले नाही. या पार्श्‍वभूमीवर गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. खडकवासल्यातील रखडलेल्या कामांसह विविध प्रश्‍नांसदर्भात सुळे यांनी राव यांची भेट घेतली. 

महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, विशाल तांबे, श्रीधर माडगूळकर, सुमित्र माडगूळकर, आलोक आंबेकर या वेळी उपस्थित होते. तेव्हा, गदिमांच्या स्मारकाचा मुद्दा मांडून ते का रखडले, याची विचारणा करण्यात आली. त्यातील अडचणी दूर करून तेथे प्रत्यक्ष काम सुरू करण्याची मागणी केली. गदिमांच्या स्मारकासाठी निधी देण्याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून सुळे या करणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कसबा पेठेतील सरदार मुजुमदार वाड्याच्या भिंतीला तडा गेल्याने वाड्याला धोका निर्माण झाला असल्याने त्याच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही सुळे यांनी चर्चा केली. 

महापालिकेत नव्याने आलेल्या गावांमधील रहिवाशांना अजूनही सेवा-सुविधा मिळत नाहीत. प्रामुख्याने रस्ते, पाणी, कचरा आणि आरोग्य आदी सुविधा पुरविण्याची गरज आहे. यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून पावले उचलावीत. 
सुप्रिया सुळे, खासदार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT