Complete memorial work of GD Madgulkar within year Chandrakant Patil pune esakal
पुणे

Pune : वर्षभरात ग.दि.माडगूळकरांचे स्मारकाचे काम पूर्ण करा; चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले, " कोरोनामुळे आणि पुणे महापालिका बरखास्त झाल्यामुळे या स्मारकाचे काम सुरू करण्यास विलंब

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ग.दि. माडगूळकर यांचे स्मारक उभारताना ते मंदिर उभारत आहोत या श्रद्धेने उभारले पाहिजे. गदिमांच्या साहित्याचे आपल्या समाजावर अनंत उपकार आहेतच पण गीतरामायणामधून त्यांनी सहजपणे रामायण लोकांना समजून सांगितले. नागरिकांना वारंवार यावेळी वाटेल असे हे भव्य स्मारक एका वर्षात पूर्ण करा अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेचे अधिकाऱ्यांना केली.

पुणे महापालिकेतर्फे कोथरूड येथे उभारण्यात येणाऱ्या पद्मश्री ग. दि. माडगूळकर स्मारक कामाचा शुभारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. आमदार भीमराव तापकीर, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सुमित्र माडगूळकर, प्राजक्ता माडगूळकर, माधुरी सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, " कोरोनामुळे आणि पुणे महापालिका बरखास्त झाल्यामुळे या स्मारकाचे काम सुरू करण्यास विलंब झाला पण पण आता एका वर्षात या स्मारकाचे काम पूर्ण करा माडगूळकर कुटुंबांनी ज्या ज्या सूचना सांगितलेले आहेत त्याचा अंतर्भाव या स्मारकाच्या आत मध्ये करा त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी हा उपलब्ध करून दिला जाईल.

ग दि माडगूळकर यांच्यामुळे गीतरामायणातून समाजाला रामायण सुलभपणे समजले. अशा साहित्यकृतीचे रचनाकार असलेल्या गदिमांचे स्मारक केवळ कवी-लेखकाचे स्मारक नसून त्यांच्याप्रती असलेली ही श्रद्धा आहे. गदिमांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारण्यात येईल. अनेक साहित्यप्रेमी श्रद्धेने हे स्मारक पूर्ण झाल्यावर भेट देतील.

आमदार तापकीर म्हणाले, गदिमांनी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्यासारख्या थोर साहित्यिकाचे स्मरण होणे आणि पुढील पिढीला यांच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी स्मारक उभारण्यात येत आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे काम सुरू होत असल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.

सुमित्र माडगूळकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात विकास ढाकणे यांनी केले. स्मारकात गीतरामायण दालन, वैयक्तिक दालन, चित्रपट दालन, साहित्य दालन, डिजिटल दालन, कॅफेटेरिया आदी विविध कामांचा समावेश आहे, असे ढाकणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT