पुणे

पिंपरी शहरात मेट्रोचे दोनशे खांब पूर्ण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिका हद्दीमध्ये मेट्रोचे २०२ खांब उभा राहिले आहेत. व्हायाडक्‍ट सव्वादोन किलोमीटर पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रोसाठी लोहमार्ग टाकण्याचे काम लवकरच सुरू होईल.

महामेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘व्हायाडक्‍टसाठी सेगमेंट बनविण्याचे विक्रमी काम जानेवारीत झाले. या महिन्यात १५० सेगमेंट बनविण्यात आले. एका दिवसात बारा सेगमेंट बनविण्याचा उच्चांक केला. आतापर्यंत एक हजार ३६६ सेगमेंट बनविले आहेत. सर्वसाधारणपणे एका स्पॅनसाठी नऊ सेगमेंट लागतात. व्हायाडक्‍टचे ८२ स्पॅन पूर्ण झाले आहेत.  स्पॅनसाठी आवश्‍यक असलेल्या खांबांवरील कॅप १२७ ठिकाणी बसविल्या आहेत.’’

संत तुकारामनगर मेट्रोस्थानकाच्या कॉनकोर्सचे (पहिल्या टप्पा) दहाही पिलर आर्म बसवून झाले आहेत. फुगेवाडी स्थानकाच्या सात खांबांना आर्म बसविण्यात आले आहेत. दापोडी व महापालिका भवन येथील स्थानकाच्या कामांना यापुढील काळात गती देण्यात येणार आहे. या दोन स्थानकादरम्यान या वर्षअखेरीला मेट्रो रेल्वेची चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

मुळा नदीमध्ये हॅरिस पुलाजवळ पाच खांब उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी तीन खांबाचे फाउंडेशन पूर्ण झाले आहे. आणखी दोन फाउंडेशनचे येत्या महिन्यात सुरू होईल. तेथील खांब वीस मीटरपर्यंत उंच आहेत. हॅरिस पुलाच्या उंचीपर्यंतचे खांब पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जातील. त्यानंतर वरील टप्प्यातील खांब उभारणी व व्हायाडक्‍टचे काम पावसाळ्यातही करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बोपोडीमध्ये १६ खांब उभारण्यात येत असून, त्यापैकी पहिल्या खांबाच्या फाउंडेशनचे काम आज करण्यात येणार आहे. रेंजहिल्स भागात फाउंडेशन घेण्यासाठी प्राथमिक कामे सुरू करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'तू माझ्यासाठी सर्वात मौल्यवान...'; कतरिना कैफची पोस्ट चर्चेत, मुलगा विहानची सुद्धा दाखवली झलक

FIFA World Cup 2026 Final: अर्जेंटिनाचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य! फायनलआधी रॉड्रीने उघड केला स्पेनच्या विजयाचा सीक्रेट प्लॅन

Live Updates Marathi: एकनाथ शिंदे यांचा चंद्रभागेत नौकविहार

Maharashtrian Recipe: तिखट खायला आवडतं? घरीच बनवा झणझणीत,सुकी लाल मिरची चटणी!

Pune News: कॅनॉलच्या कठड्यावर लटकलेल्या चारचाकी गाडीतील चालकाला उरुळी कांचन पोलिसांनी शिताफीने सुखरूप बाहेर काढले

SCROLL FOR NEXT