mumbai high court esakal
पुणे

Pashan Baner Link Road : पाषाण-बाणेर लिंक रस्त्यासाठी सक्तीने भूसंपादन करा; उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

पाषाण, बालेवाडी, बाणेर, औंध या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढलेली असताना पाषाण आणि बाणेरला जोडणारा लिंक रस्ता अर्धवट असल्याने वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पाषाण बाणेर लिंक रस्त्याचा रखडलेला भाग पूर्ण करण्यासाठी जागा मालकाला रोख मोबदला देऊन महापालिकेने २०० मीटर लांबीच्या जागेचे सक्तीने भूसंपादन करावे. त्यासंदर्भातील कालबद्ध आराखडा २० सप्टेंबरपर्यंत सादर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.

त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बाणेर-पाषाण लिंक रोड वेल्फेअर ट्रस्टने महापालिकेविरोधात याचिका दाखल केली होती.

पाषाण, बालेवाडी, बाणेर, औंध या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढलेली असताना पाषाण आणि बाणेरला जोडणारा लिंक रस्ता अर्धवट असल्याने वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. १९९२ च्या प्रादेशिक विकास आराखड्यात १२०० मीटर लांब आणि ३६ मीटर रुंद असा पाषाण बाणेर लिंक रस्ता मंजूर आहे.

महापालिकेने २०१४ मध्ये या रस्त्याचे काम सुरू केले पण एका ठिकाणी १५० मीटर तर दुसऱ्या ठिकाणी ५० मीटरची जागा ताब्यात न आल्याने हा रस्ता अर्धवट आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ॲड. सत्या मुळे यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेमध्ये जमीन मालक मध्यस्थी म्हणून सहभागी झाले होते.

या सुनावणीमध्ये जमीन मालकाने रस्ता करण्यासाठी महापालिकेला जागा देण्यास तयार असून, रोख मोबदला द्यावा अशी मागणी केली आहे. पण महापालिका प्रशासनाने प्रशासक काळात स्थायी समितीकडून निधी मंजूर करता येणार नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे भूसंपादनाचा तिढा कायम असल्याचे ॲड. मुळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

या भागातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन महापालिकेने हा २०० मीटरचा रस्ता आत्तापर्यंत पूर्ण करणे आवश्‍यक होते, पण त्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही त्याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. महापालिका आयुक्तांनी या २०० मीटर जागेचे सक्तीने भूसंपादन करून या भागाचे काम कधी पर्यंत पूर्ण होईल याचा आराखडा २० सप्टेंबर पर्यंत सादर करावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे, असे ॲड. मुळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT